Bandatatya Karadkar : कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यासाठी शासन परवानगी देत नाही. सर्व प्रमुख सोहळ्याच्या पादुका थेट बस मधून नेण्याचा प्रस्ताव शासनांकडून देण्यात आला होता. परंतु सर्व पालकींच्या प्रमुखांनी याला नकार देत थेट पायीवारी काढत असल्याची भूमिका घेतली आहे. वारकऱ्यांचे नेते हभप बंडात्यात्या कराडकर यांनी शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बन्ध घालून परवानगी द्यावी अशी मागणी केली. तसेकंज वारी ला येणारा समाज अनियंत्रित असेल आणि त्यावेळी काही कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असं कराडकर म्हणाले. अर्थातच कराडकर यांनी मांडलेली ही भूमिका केवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठीची असल्याने इतर सोहळ्यातील पालखी प्रमुख बंडात्यात्या करडकरांच्या मागणीला पाठींबा देतात का यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातीय दुसरीकडे सर्व पालखी सोहळे वेगवेळ्या वाटेने जाणार असल्याने प्रशासनावर ताण येणार असेल तर सर्व पालख्या एकाच मार्गावरून नेल्या जाव्यात, अशी अत्यन्त ऐतिहासिक आणि धाडसी प्रस्ताव सोहळ्यातील मुख्य मानकरी राजा भाऊ चोपदारांनी मांडून शासना समोर आणखी एक पर्याय ठेवला आहे त्यामुळे आता या सगळ्याप्रकरणी शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Watch Bandatatya Karadkar Demands CM To Act Early On pandharpur vari in Solapur
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App