कीर्तनकार समाजाचे उद्बोधन, प्रबोधन करून आचारविचारांचे महत्त्व नेहमीच पटवून देत असतात. परंतु द्वारली गावातील गजानन महाराज चिकनकर यांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. स्वत:च्या वयोवृद्ध पत्नीला या महाराजांनी केलेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियाही येत आहेत. व्हिडिओमध्ये हे महाराज आपल्या खुर्चीवर बसलेल्या वयोवृद्ध पत्नीला आधी चापटांनी, लाथांनी मारहाण करतात. नंतर हातातील प्लास्टिकच्या बादलीनेही बेदम मारहाण करतात. त्यांच्या या कृत्याचा सर्वस्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येत असून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. Watch Maharaj beating His elderly wife, video goes viral
https://youtu.be/EUISdCmXqLA
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App