आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले वाय. एस. आर. काँग्रेसचे बंडखोर खासदार के. रघु रामकृष्ण राजू यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. Supreme Court orders, rebel YSR congress MP to be examined in military hospital
प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले वाय. एस. आर. काँग्रेसचे बंडखोर खासदार के. रघु रामकृष्ण राजू यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला.
के. रघु रामकृष्ण राजू यांना दिलासा देत न्या. विनीत सरण आणि बी. आर. गवई यांच्या न्यायपीठाने त्यांना पुढील आदेशापर्यंत सिकंदराबादमधील लष्कराच्या इस्पितळात ठेवण्याचा आणि तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून नियुक्त केल्या जाणाºया न्यायिक अधिकाºयाच्या उपस्थितीत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
राजू यांच्या वैद्यकीय तपासणीचे व्हिडिओ चित्रीकरण करावे आणि बंद लखोट्यात अहवाल पाठवावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने महटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार त्या वाय श्रेणीची सुरक्षाही दिली जावी.
राज्य सरकारवर टीका केल्याने मला धोका आहे, असे सांगत राजू यांनी मागच्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयात सुरक्षेसाठी धाव घेतली होती.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नाकारला होता. त्यासंबंधी राजू यांनी आणि त्यांचे चिरंजीव भरत यांनी केलेल्या दोन याचिकांवर सुनावणी करतांना उपरोक्त आदेश दिला. राजू यांची खासगी इस्पितळात वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी भरत यांनी याचिकेत केली होती. राजू यांच्यावर अलीकडेच हृदयाची शस्रक्रिया झालेली असल्याची न्यायपीठाने दखल घेतली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश सरकारला १९ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी २१ मे रोजी ठेवली आहे.
राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने १५ मे रोजी देशद्रोहासह विविध आरोपांखाली अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजू यांना सिकंदराबादेतील लष्करी इस्पितळात वैद्यकीय तापसणीसाठी नेण्यात आले. हायकोटार्ने त्यांना खासगी इस्पितळात हलविण्याचे आदेश देऊन त्यांना गुंटूरमधील जिल्हा तुरुंगात ठेवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App