राष्ट्रध्वजाचे डिझाईन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाला भारतरत्न द्या, वाय. एस. जगन मोहन यांची मागणी

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे डिझाईन करणारे पिंगाली व्यंकय्या यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात यावे अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन यांनी केली आहे.  Give Bharat Ratna to the freedom fighter who designed the national flag, YSR Jagan Mohan demands


वृत्तसंस्था

हैद्राबाद : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे डिझाईन करणारे पिंगाली व्यंकय्या यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात यावे अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन यांनी केली आहे.

जगनमोहन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करणार आहोत. तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या गौरवाची बाब आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचा भावना पेटविणारा आहे. त्यामुळे तिरंगा राष्ट्रध्वजाचे डिझाईन करणाऱ्या व्यंकय्या यांचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले जावे.भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजित केलेल्या कार्यक्रमांचे जगन मोहन यांनी स्वागत केले. आझादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीच्या राष्ट्रीय समितीची बैठक नुकतीच झाली. जगन मोहन यांनी शुक्रवारी गुंटुर जिल्ह्यातील मचेरला या व्यंकय्या यांच्या मुळ गावी असलेल्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी व्यंकय्या यांच्या कन्या घंतासाला सीता महालक्ष्मी आणि इतर कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यंकय्या यांच्या प्रतिमेचे अनावरण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली. हर घर झंडा (प्रत्येक घरी राष्ट्रध्वज) ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.

Give Bharat Ratna to the freedom fighter who designed the national flag, YSR Jagan Mohan demands

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*