जगातील सर्वात श्रीमंत दांपत्य असलेल्या बिल आणि मेलिंडा गेटस यांनी घटस्फोट घेतला आहे. २७ वर्षांच्या सहजीवनानंतर आमचे मार्ग वेगळे झाले असल्याचे त्यांनी एका संयुक्त पत्रकात म्हटले आहे.Divorce of the richest couple in the world, Bill and Melinda Gates became separated
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत दांपत्य असलेल्या बिल आणि मेलिंडा गेटस यांनी घटस्फोट घेतला आहे. २७ वर्षांच्या सहजीवनानंतर आमचे मार्ग वेगळे झाले असल्याचे त्यांनी एका संयुक्त पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी म्हटले आहे की, मागील 27 वर्षे सोबत प्रवास केला. आता वेगळे होत आहोत.
आम्ही खूप विचाराअंती आणि आमच्या नात्यावर काम करुन अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षांच्या प्रवासात आम्ही 3 मुलांना वाढवलं आणि जगभरातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था उभी केली.
आमचा त्या विचारांवर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही घटस्फोटानंतरही ते काम करणं सुरुच ठेऊ.भविष्यातही सोबत काम करणार असलो तरी उर्वरीत आयुष्यात आम्ही कपल म्हणून एकत्रित राहू शकत नाही.
आम्ही एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आम्हाला यासाठी अवकाश आणि खासगीपण द्यावं हीच विनंती,ह्व असंही बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी आपल्या पत्रकात म्हटलं.
बिल गेट्स यांनी 1975 मध्ये पॉल एलनसोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. वयाच्या 31 व्या वर्षी बिल गेट्स जगातील अब्जपती बनले. ते सर्वात कमी वयाचे अब्जपती ठरले.
गेट्स 2000 पर्यंत कंपनीचे सीईओ होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. गेट्स आपला सर्वाधिक वेळ या संस्थेच्या कामासाठीच देतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App