वृत्तसंस्था
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी – देवाची (ता. खेड) येथील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र, स्थानिकांना अस्थी विसर्जन करता येणार आहे. Prohibition of immersion of bones in the holy Indrayani river in Alandi
इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनासाठी परगावाहून लोकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनाअस्थी विसर्जनास बंदी घालावी, अशी मागणी होती.
अखेर शुक्रवारी (ता.२३) पालिकेने आदेश जारी केला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलिस अधिनियम १९५१, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल,
असे मुख्याधिकारी अंकुश जाधव व वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.
महत्वाच्या’ बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App