लसी चोरल्याचे लक्षात आल्यावर झाली मानवता जागी; सॉरी म्हणून परत पाठविले रुग्णालयाला..


किंमती बॅग म्हणून आपण केलेली चोरी कोरोना प्रतिबंधक लसींची असल्याचे लक्षात आल्यावर एका चोरट्याच्या मनातील मानवताही जागी झाली. त्याने चोरी केलेल्या रुग्णालयाजवळील एका चहाच्या टपरीवर लसींनी भरलेली बॅग आणून ठेवली.When he realized that the vaccine had been stolen, he also show his humanity


विशेष प्रतिनिधी

जिंद : किंमती बॅग म्हणून आपण केलेली चोरी कोरोना प्रतिबंधक लसींची असल्याचे लक्षात आल्यावर एका चोरट्याच्या मनातील मानवताही जागी झाली. त्याने चोरी केलेल्या रुग्णालयाजवळील एका चहाच्या टपरीवर लसींनी भरलेली बॅग आणून ठेवली.

हरयाणातील जिंदमध्ये सिव्हील हॉस्पिटलमधून करोनावरील लसीचे डोस चोरी झाले. यामुळे हॉस्पिटल प्रशासन हादरलं. पण संध्याकाळ होता होता एक दुचाकी स्वार पोलिस ठाण्यासमोरील चहाच्या दुकानावर प्लास्टिक बॅग घेऊन आला.



ही बॅग चहा दुकानावर सोडून पसार झाला. ही बॅग उघडून बघितल्या त्यात लसीचे ६२२ डोस होते. यासोबतच चोराने बॅगमध्ये एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती. मला माफ करा. बॅगमध्ये करोनावरील लसीचे डोस आहेत हे मला माहिती नव्हतं’, असं त्याने त्या चिठ्ठीत लिहिलं होते.

जिंदच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लसीचे १२७० डोस आणि कोवॅक्सिनचे ४४० डोस चोरी झाल्याचं समोर आलं होतं. यासोबतच फाइलही चोरी झाली होती. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन जण लसींचे डोस चोरताना दिसले. यानंतर पोलिस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी पुढील तपास करण्यापूर्वीच सिव्हील लाइन पोलिस ठाण्यासमोरील चहाच्या दुकानवर चोर यापैकी ६२२ डोस बॅगेत सोडून पळून गेला.

यापैकी कोवॅक्सिनचे ४४० आणि कोविशिल्डचे १८२ डोसेस आहेत. आता पोलिस चोरी झालेल्या उर्वरीत डोसेसचा तपास करत आहेत. सिव्हील हॉस्पिटलच्या पीपी सेंटरमध्ये बुधवारी संध्याकाळी लसीकरण केंद्रांवरील उवरलेले १७१० लसीचे डोस फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले होते. यापैकी १२७० डोस कोविशिल्ड आणि ४४० कोवॅक्सिनचे होते.

When he realized that the vaccine had been stolen, he also show his humanity

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात