कुंभमेळ्याआधी कामांना वेग; पुणे-नाशिक भुयारी मार्गाचे 80 टक्के काम पूर्ण !

विशेष प्रतिनिधी

नाशिक: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विविध विकास कामांना वेग आला आहे. पुणे रोड ते नाशिक दरम्यानचा 100 मीटर भुयारी मार्ग जानेवारीअखेर खुला होणार आहे. द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची लवकरच सुटका होणार आहे. त्यामुळे आता पुणे ते नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा मिळणार आहे.

पुणे रोड ते नाशिकदरम्यानच्या द्वारका इंटरचेंजच्या कामाला वेग आला आहे. उड्डाणपुलाखाली मर्यादित जागा आहे. तरीही महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने अभियांत्रिकीची आव्हाने पेलत 563 मीटर इंटरचेंजचे 80 टक्के काम पूर्ण केले आहे. पुणे बाजूकडील रॅम्प आणि भुयारी मार्गाचे 2 टप्पे पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील 53 मीटर लांबीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. सध्या त्याच्या काँक्रीटच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक क्यूरिंग प्रक्रिया सुरू आहे.



काँक्रीट क्युरिंग व नाशिक बाजूकडील काम देखील अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मुख्य मार्ग जानेवारीत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. ही बाब शहरासाठी दीर्घकालीन दिलासादायक आहे. दरम्यान, मुंबई आणि धुळे बाजूकडील वाहनधारकांना कुंभमेळ्यापर्यंत वाहतूक कोंडीचाच सामना करावा लागेल. दोन्ही बाजूंकडील ‘यू टर्न’ चे काम थेट दुसऱ्या टप्प्यात ढकलण्यात आले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यानंतरच मुंबई आणि धुळे बाजूकडील यू- टर्नची कामे करण्यात येतील.

Work gains momentum ahead of Kumbh Mela; 80 percent of the Pune-Nashik underpass project completed!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात