दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा पुढाकार; १ महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द!

NCP corporators

विशेष प्रतिनिधी

पुणे: दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे महानगरपालिकेच्या सर्व २९ नगरसेवकांनी सप्टेंबर महिन्याचे आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.



या उपक्रमांतर्गत जमा झालेला धनादेश महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, गटनेते व विरोधी पक्ष नेते निलेश निकम आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे तसेच पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.

दुष्काळाच्या संकटात शेतकरी बांधवांना आधार मिळावा आणि त्यांच्या मदतीसाठी आपलेही योगदान असावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे, हीच लोकसेवेची खरी भावना आहे. असे मत विरोधी पक्ष नेते निलेश निकम यांनी व्यक्त केले.

NCP corporators take the initiative to provide aid to drought-affected people

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात