विशेष प्रतिनिधी
मुंबई : जर ५०० कोटी रुपये मनाेज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत, तर इतकी मोठी रक्कम नेमकी गेली कुठे?”. हा थेट मनी लाँडरिंगचा प्रकार असून, महाराष्ट्र पोलीस आणि ईडीने तात्काळ पीएमएलए अंतर्गत गुन्हे दाखल करून या घोटाळ्यात सामील असणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाचा संदर्भ देत य राऊत यांनी अमित शहा यांना दोन पानांचे सविस्तर पत्र लिहिले आहे. यामध्ये राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ED) ‘पीएमएलए’ (PMLA – Prevention of Money Laundering Act) अंतर्गत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आतापर्यंत भाजपने खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेतल्या, पण आता त्यांनी आंदोलनेही विकत घ्यायला सुरुवात केली आहे,” असा आराेप करतराऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या कोअर टीममधील वरिष्ठ नेत्यांकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगे पाटील यांना दिले जाणार होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणाचे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी आणि जरांगे यांना गप्प करण्यासाठी हा व्यवहार झाल्याचा दावा ऑडिओ क्लिपमधून समोर आला आहे.
राऊत यांनी म्हटले आहे की मार्च २०२१ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केवळ १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. कोणताही पुरावा नसताना ईडीने तत्परतेने कारवाई करत अनिल देशमुखांना अटक केली होती. त्या तुलनेत मनोज जरांगे यांनी केलेले आरोप अधिक गंभीर आहेत कारण इथे ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात स्पष्ट आणि नाकारता न येण्याजोगा पुरावा उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App