पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख ठरली; 24 ऑक्टोबरला विद्या प्रतिष्ठानमध्ये येणार, ‘हे’ आहे कारण

Baramati.

विशेष प्रतिनिधी

बारामती : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. 24 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसराला भेट देणार आहेत. यावेळी ते विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन करणार आहेत. तसेच संस्थेत उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI संस्थेची पाहणी आणि त्यासंदर्भातील सादरीकरणही पंतप्रधानांसमोर होण्याची शक्यता आहे.

बारामतीत मोदींच्या दौऱ्याची तयारी सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य दौऱ्याची माहिती समोर आल्यानंतर बारामतीतील राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (23 ऑक्टोबर) बारामतीतील नक्षत्र गार्डन येथे असलेल्या प्रेरणास्थळाची पाहणी केली.

यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात पदाधिकारी आणि संबंधित व्यक्तींसोबत बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

या वेळी युवा नेते युगेंद्र पवार, विश्वस्त विठ्ठल मणियार, प्रताप पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलवडे, विश्वस्त किरण गुजर आणि सचिव नीलिमा गुजर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


विद्या प्रतिष्ठानमध्ये ‘प्रेरणास्थळ’ाची उभारणी

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेले ‘प्रेरणास्थळ’ हे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृती आणि विचारांना समर्पित करण्यात आले आहे. शांतता, समता आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे, हा या संकल्पनेमागील प्रमुख उद्देश आहे.

या प्रेरणास्थळावर भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारण्यात आला असून, विविध महापुरुषांच्या चित्रांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे.

‘या’ कारणासाठी मोदींची बारामतीला भेट

या प्रेरणास्थळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबर रोजी मोदी बारामतीत येऊन प्रेरणास्थळाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच विद्या प्रतिष्ठानमध्ये विकसित करण्यात आलेल्या AI संस्थेची माहिती आणि सादरीकरण पंतप्रधानांसमोर करण्यात येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात तयारीला वेग आला असून, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि इतर प्रशासकीय व्यवस्थांचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

Date finalized for Prime Minister Modi’s visit to Baramati.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात