सोयाबीन-कापूस करपले, शेतकरी संकटात; मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीसांचा मोठा निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. सोयाबीन, कापूस यांसह विविध पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र असून मराठवाड्यात परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. Fadnavis

शेतीच्या नुकसानीसंदर्भात उद्यापासून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची माहिती संकलित केली जाणार आहे. बहुतांश भागांत पिके करपल्याचे दिसत असून सोयाबीन आणि कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे. कोकणात भातपिकावरही परिणाम झाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पिण्याचे पाणी आणि चाऱ्यावर विशेष लक्ष

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केवळ पिकांचे नुकसानच नव्हे, तर पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही प्राधान्याने हाताळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका, नगरपालिका आणि पंचायत राज संस्थांना पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दुष्काळ निवारणासाठी मंत्र्यांची उपसमिती

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, संजय राठोड, प्रताप सरनाईक, बाबासाहेब पाटील आणि मकरंद पाटील यांचा समावेश आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे समितीचे सदस्य सचिव असतील.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीबाबतची माहिती या समितीकडे सादर केली जाणार असून आवश्यक उपाययोजनांसाठी समितीला अधिकार देण्यात आले आहेत.



‘सर्व मंत्री आणि आमदार बांधावर जाणार’

शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दौरा करणार आहेत. त्याचबरोबर सर्व मंत्री आणि आमदारांनीही बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

एनडीआरएफच्या मदतीसाठी ठरावीक नियम आणि प्रक्रिया असली, तरी त्यासाठी सरकार वाट पाहणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. यापूर्वीही सरकारने केंद्राच्या निकषांची प्रतीक्षा न करता दुष्काळसदृश परिस्थितीवरील उपाययोजनांची तयारी सुरू केल्याचे सांगितले होते.

सरकारवर सपकाळांची टीका

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. गणपती उत्सव सुरू असताना राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहेत, असे सांगत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच SIR आणि लोकसंख्येच्या आकडेवारीशी संबंधित मुद्दे उपस्थित करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे अंतिम मूल्यांकन आणि त्यानंतर मदतीबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या मदत व पुनर्वसन प्रक्रियेनुसार नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करून त्याची माहिती तहसील, जिल्हाधिकारी आणि विभागीय पातळीवरून शासनाकडे पाठवली जाते.

Fadnavis’s major decision after the cabinet meeting

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात