‘अंगणवाडी सेविका केवळ सेविका नव्हे, तर पुढची पिढी घडविणाऱ्या मातृशक्ती’

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : अंगणवाडी सेविका या केवळ सेविका नसून बालकांच्या संगोपनासह त्यांच्या सर्वांगीण विकासात मातृत्वाची भूमिका बजावत आहेत. समाजाची पुढील पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करीत असून, त्यांच्या योगदानाचा गौरव करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवछत्रपती रंग भवन येथील सभागृहात अंगणवाडी सेविकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात २५ अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २०४७ पर्यंत विविध क्षेत्रांत सातत्याने काम करण्याची गरज आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान तसेच अंगणवाडी सेविकांचा सन्मान यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

अंगणवाडी सेविका बालकांचे पोषण, संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. पुढील पिढीच्या जडणघडणीत त्यांची भूमिका मोलाची आहे. महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिला सक्षम झाल्यास कुटुंब आणि समाज अधिक सक्षम होतो. त्यामुळे महिला व बालकांच्या कल्याणासाठीच्या शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या योजना आणि विविध उपक्रमांची माहिती नागरिक व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत. समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढवून विकासाची प्रक्रिया अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात येत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

संयोजक मोहन डोंगरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे कौतुक केले. बालकांचे संगोपन, पोषण तसेच त्यांच्या सामाजिक जडणघडणीत अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनीही अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, प्रशांत फत्तेपूरकर, स्थायी समिती सभापती रणजीता चाकोते, शिक्षणाधिकारी धनंजय ढेपे, शशिकांत चव्हाण, बाल विकास अधिकारी दीपक ढेपे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Anganwadi workers are not merely workers, but a maternal force shaping the next generation.”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात