तब्बल तीन हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले भाजप आमदार पराग शाह मुंबईतील रस्त्यावर भिकाऱ्याच्या वेशात फिरताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, त्यांच्या या वेगळ्या रूपामागचे कारण समोर आल्यानंतर या व्हिडिओची चर्चा आणखी रंगली आहे. Parag Shah
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळख असलेले भाजपचे पराग शाह हे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कोट्यवधींची संपत्ती असलेले शाह अचानक घाटकोपरच्या रस्त्यांवर भिकाऱ्याच्या वेशात फिरताना दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
पराग शाह यांनी काही तास भिकाऱ्याचा वेश धारण करून घाटकोपर परिसरातील रस्त्यांवर फिरत लोकांकडे मदत मागितली. काही नागरिकांनी त्यांना पैसे किंवा खाण्यासाठी अन्न दिले, तर काहींनी त्यांना तेथून हुसकावून लावले. या संपूर्ण अनुभवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
गुरुंच्या आदेशामुळे घेतला भिकाऱ्याचा अनुभव
पराग शाह यांच्या या कृतीमागे त्यांच्या गुरुंचा आदेश असल्याचे समोर आले आहे. शाह यांचे गुरु नम्रमुनी यांनी त्यांना एक दिवस भिकाऱ्याचे जीवन अनुभवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर गुरुंच्या आदेशाचे पालन करण्यासाठी शाह यांनी आपली सुरक्षा व्यवस्था, पोलिस संरक्षण आणि महागड्या गाड्या बाजूला ठेवत भिकाऱ्याचा वेश धारण केला.
या वेषात त्यांनी घाटकोपरच्या रस्त्यांवर सामान्य भिकाऱ्याप्रमाणे काही तास घालवले. रस्त्याच्या कडेला बसून त्यांनी जेवण केले तसेच नागरिकांकडे मदतीची मागणी केली.
Param Pujya Namramuni Gurudev is currently in Ghatkopar for his grand 2026 Chaturmas. MLA Parag Shah has given his newly built flat schemes to all the devotees for residing, who have come from all over India. Salute to this man. pic.twitter.com/o11ZUQkw3y — GoldenEye_6 (@GoldenEye_6) September 14, 2026
Param Pujya Namramuni Gurudev is currently in Ghatkopar for his grand 2026 Chaturmas.
MLA Parag Shah has given his newly built flat schemes to all the devotees for residing, who have come from all over India.
Salute to this man. pic.twitter.com/o11ZUQkw3y
— GoldenEye_6 (@GoldenEye_6) September 14, 2026
कुठे मिळाली मदत, तर कुठे हुसकावून लावले
या अनुभवादरम्यान शाह यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही नागरिकांनी त्यांना मदत केली, अन्न दिले, तर काहींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. काही ठिकाणी मात्र त्यांना हुसकावून लावण्यात आले.
या अनुभवातून समाजातील भिकाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना मिळणारी वागणूक आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मेकअप काढून पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचले
विशेष म्हणजे, भिकाऱ्याचा मेकअप काढल्यानंतर पराग शाह पुन्हा त्याच परिसरात गेले. यावेळी त्यांनी काही नागरिकांशी संवाद साधला आणि भिकाऱ्याच्या रूपात असताना त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांबाबत चर्चा केली.
तीन हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेला आमदार अचानक भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर का फिरत आहे, असा प्रश्न उपस्थित करणारा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App