पुणे रेल्वे स्थानकावर DRIचा मोठा छापा; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, महिला प्रवासी अटकेत

विशेष प्रतिनिधी

पुणे : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पुणे प्रादेशिक पथकाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे पुणे रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करत संशयित अॅम्फेटामाइन आणि एमडीएमए असा सुमारे ३.४१ कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. Pune Railway Station

गुप्त माहितीनुसार अधिकाऱ्यांनी पुणे रेल्वे स्थानकावर पाळत ठेवून दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाला ताब्यात घेतले.

तिच्या सामानाची झडती घेतली असता २,५३२ ग्रॅम वजनाचा पांढऱ्या-पिवळसर रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ, जो अॅम्फेटामाइन असल्याचा संशय आहे, तसेच ८७८ ग्रॅम विविध रंगांच्या गोळ्या, ज्या 3,4-Methylenedioxymethamphetamine (MDMA) असल्याचा संशय आहे, आढळून आल्या.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची अंदाजे किंमत ३.४१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. हा साठा NDPS कायदा, १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आला असून महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध पुरवठा रोखण्यासाठी DRI कडून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या उद्दिष्टाला हातभार लावत अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कारवाई सुरू आहे.

Drugs Worth 3.41 Crore Seized at Pune Railway Station, Woman Passenger Arrested

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात