Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! जुलैचा 1,500 हप्ता जमा होण्यास सुरुवात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याचे ₹1,500 लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांनी आपले बँक खाते तपासून पैसे जमा झाले आहेत का, हे पाहावे.

महिला व बाल विकास विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. जुलैच्या हप्त्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या लाभार्थींना रक्षाबंधनापूर्वी पैसे मिळण्यास सुरुवात झाल्याने दिलासा मिळाला आहे. सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला निधी वितरित झाल्यानंतर हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. योजना सुरू झाली तेव्हा सुमारे 2 कोटी 47 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


ई-केवायसी पूर्ण न केल्याने सुमारे 62 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली. याशिवाय उत्पन्नाची मर्यादा, सरकारी नोकरी आणि कुटुंबातील एकापेक्षा अधिक लाभार्थी यांसह विविध कारणांमुळेही लाभार्थी संख्या कमी झाली. सध्या पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1 कोटी 65 लाख असल्याचे सांगितले जात आहे.

जयंत पाटलांचा सरकारवर सवाल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित झालेल्या निधीवरून सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते.

जून 2026 पर्यंत सुमारे 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित झाल्याचा दावा आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आला. ई-केवायसी न करणे, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, सरकारी कर्मचारी असणे किंवा एकाच कुटुंबातील अनेक अर्ज अशा कारणांमुळे लाभार्थी अपात्र ठरल्याचे सांगण्यात आले.

योजना लागू करण्यापूर्वी पात्र लाभार्थ्यांची योग्य छाननी का झाली नाही आणि अपात्र लाभार्थ्यांना निधी वितरित होण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, जुलैचा ₹1,500 हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने पात्र लाभार्थी महिलांनी बँक खाते तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Good news for Ladki bahin Yojna! Disbursement of the July installment of 1,500 has begun.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात