राहुल गांधींशी जवळीक, आंदोलनाचं निमंत्रण अन् बॅनर?; रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या काँग्रेस नेत्यांसोबत वाढलेल्या जवळिकीमुळे त्यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या तीन घटनांमुळे या चर्चांना विशेष बळ मिळाले आहे.

रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून नागपुरात आंदोलन करण्याचा इशारा देताना त्यांनी राहुल गांधी यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. स्वपक्षातील नेत्यांऐवजी राहुल गांधी यांना दिलेले हे निमंत्रण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.


नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा


याशिवाय पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाच्या वेळी रोहित पवारांच्या स्वागताचे बॅनर झळकले होते. या बॅनरचीही राजकीय वर्तुळात चर्चा झाली. दरम्यान, रोहित पवार पंढरपूरमध्ये उपोषणाला बसले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची भेट घेतली होती.

या पार्श्वभूमीवर रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र, रोहित पवार यांनी या चर्चांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद नसल्याने राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे रोहित पवारांच्या काँग्रेस नेत्यांसोबतच्या वाढत्या संपर्कामागे नेमके राजकीय समीकरण काय आहे, याबाबत उत्सुकता कायम आहे.

Will Rohit Pawar join Congress? These 3 incidents fuel discussions

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात