जरांगेंवर ‘व्हायरस’ टिप्पणी भोवली; गुणरत्न सदावर्तेंवर FIR दाखल

विशेष प्रतिनिधी

बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना व्हायरस म्हणणं ज्येष्ठ वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना चांगलेच भोवले आहे. बीडमध्ये शनिवारी झालेल्या एका मोर्चामध्ये जरांगे पाटील यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत त्यांना धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Manoj Jarange

बीडमध्ये शनिवारी विलास घुले हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीमनोज जरांगे पाटील यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. सदावर्ते यांच्या या टीकेनंतर जरांगे समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. यानंतर जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय सहकारी गंगाधर काळकुटे यांनी थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सदावर्तेंविरोधात अधिकृत फिर्याद दिली. या फिर्यादीची दखल घेत पोलिसांनी सदावर्ते यांच्याविरोधात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.



मोर्चामध्ये बोलताना सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांची तुलना थेट आजाराशी केली होती. “मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून राज्यात व्हायरस पसरवण्याचे काम सुरू आहे. यांना राज्याचा महसूलमंत्री म्हणून एक ओबीसी नेता नको आहे,” अशी टीका केली.

“जरांगे पाटलांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा वारंवार अपमान केला जात आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नेमका किती सहभाग आहे, हे मला माहिती नाही. परंतु, जर यापुढे मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांचा अपमान केला, तर आम्हीदेखील एकनाथ शिंदे यांचा अपमान करू,” असा इशारा सदावर्ते यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या हत्याप्रकरणी न्याय मागण्यासाठी आणि मुख्य आरोपींच्या अटकेसाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी बीडमध्ये एक विराट मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याला तातडीने अटक करण्याची मागणी केली.

Case filed against Gunratna Sadavarte for calling Manoj Jarange a ‘virus’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात