उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द; कुणबी जात प्रमाणपत्रही अवैध

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बंडखोर आणि खासदारांमुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आधीच धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. विशेष म्हणजे विशाखा राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि AIMIM पक्षाला देखील जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने झटका दिला आहे. Vishakha Raut

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशाखा राऊत या उद्धव ठाकरे गटाच्या दादर प्रभागातील नगरसेविका आहेत. विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. दरम्यान, विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा विषय सभागृहात मांडल्यावर त्यावर चर्चा होईल. तर दुसरीकडे जात प्रमाणपत्र योग्य असल्याचं सिद्ध करण्यासाठी विशाखा राऊत यांच्याकडे 3 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत विशाखा राऊत आपले नगरसेवक पद वाचविण्यासाठी न्यायालयाकडे अपील करू शकतात.



दरम्यान, याआधी मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं होतं, तर गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या AIMIM च्या नगरसेविका रोशन शेख यांचीही सदस्यता रद्द केली होती. बुशरा नदीम मलिक यांचे नगरसेवक पद जात पडताळणी समितीने रद्द केले होते. तर रोशन शेख यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर जात पडताळणी समितीकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

माध्यमांशी संवाद साधताना विशाखा राऊत म्हणाल्या की, न्यायिक क्षेत्राच्या तांत्रिक कारणावरून माझे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. नवीन तरतुदीप्रमाणे मला या निर्णयाला अपील करण्यासाठी 3 महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे सध्या तरी माझे नगरसेवक पद रद्द झालेले नाही. तसेच माझ्याकडे 1911 पासूनचे माझ्या पंजोबांचे कागदपत्रे आहेत. ती सगळी वैध कागदपत्रे असून माझी जात कुणबी असल्याचे सिद्ध करते. मात्र शिंदे गटाच्या दबावामुळे माझे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप विशाखा राऊत यांनी केला.

Vishakha Raut’s corporator membership cancelled.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात