कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलिसांना मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिवादन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कर्तव्य बजावताना देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. मुंबईतील नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. Chief Minister Fadnavis

गेल्या वर्षभरात वीरमरण आलेल्या ३६ पोलीस अधिकारी आणि ११८ पोलीस अंमलदार अशा एकूण १५४ पोलीस हुतात्म्यांच्या स्मृतींना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले. असीम ध्येयनिष्ठेने कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या या शूरवीरांच्या त्यागाचे त्यांनी स्मरण केले.



या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली.

विविध देशांच्या दूतावासांतील निमंत्रित, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच शहीद पोलिसांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना अभिवादन केले.

२१ ऑक्टोबरला पोलीस स्मृतिदिन

कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेचे सर्वोच्च उदाहरण घालून देणाऱ्या पोलीस हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन संचलन आयोजित केले जाते. यंदा १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्य तसेच अर्धसैनिक दलांमध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या संचलन कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांनी केले. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या पोलीस हुतात्म्यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.

Chief Minister Fadnavis pays tribute to the policemen who lost their lives while performing their duties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात