बिडकरांचा बालवडकरांना दणका? सुनेत्रा पवारांना पत्र

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिकेच्या राजकारणात महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वक्तव्यांबाबत आणि सभागृहातील भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. Ganesh Bidkar

बिडकर यांनी पत्रातून आरोप केला आहे की, अमोल बालवडकर गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर सातत्याने टीका करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्याबाबत बालवडकर यांनी सार्वजनिक व्यासपीठांवर केलेली वक्तव्ये महायुतीच्या राजकीय शिष्टाचाराला धरून नसल्याचे बिडकर यांनी म्हटले आहे.



मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवर अशा प्रकारे टीका झाल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची चिंताही पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. बालवडकर यांची वक्तव्ये अशोभनीय असून त्याचा थेट परिणाम महायुतीच्या एकत्रित राजकीय वाटचालीवर होऊ शकतो, असा दावा बिडकर यांनी केला आहे.

महापालिकेच्या मुख्य सभेतील बालवडकर यांच्या भूमिकेवरही बिडकर यांनी आक्षेप घेतला आहे. सभागृहातील त्यांचे वर्तन आक्रमक आणि असंसदीय असल्याचा आरोप करत, महापालिकेच्या सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या पत्रामुळे पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांमधील हा वाढता तणाव महायुतीच्या नेतृत्वासाठी महत्त्वाचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

आता गणेश बिडकर यांच्या पत्राची राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व कितपत दखल घेणार, अमोल बालवडकर यांच्याबाबत पक्षाकडून काही भूमिका घेतली जाणार का आणि या आरोपांवर बालवडकर काय स्पष्टीकरण देणार, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Corporation over Amol Balwadkar; Ganesh Bidkar’s Letter to Sunetra Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात