तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता खाद्यतेल भेसळ विक्रेत्यांकडे! सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; नियम मोडल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास

Tukaram Mundhe

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अन्न व औषध प्रशासन खात्याचे तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यापासून एफडीएच्या राज्यभरात धडक कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शाळांच्या आवारापासून ते अनेक प्रसिद्ध हॉटेल्सवर, दूध – पनीर विक्रेते या सर्वांवर मुंढे करडी नजर ठेवून आहेत. या सर्वांनंतर आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा खाद्यतेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. आम्ही ‘सेव्ह फूड सेव्ह ड्रग सेव्ह महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत काम करत आहोत. त्याच अनुषंगाने पुढची महत्वाची ऑर्डर काढत आहोत, एडिबलं ऑईलबद्दल (खाद्यतेल) हा आदेश असल्याचे सांगत त्यांनी याबाबत होणाऱ्या कारवाईची सुद्धा माहिती दिली आहे. नोंदणी न केलेल्या काही खाद्य तेल उत्पादक कंपन्यांची माहिती मिळाल्यानंतर तुकाराम मुंढेंनी याबाबत कारवाईचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात 7 वर्षांपासून आजन्म शिक्षेची कारवाई करण्यात येणार आहे.



अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी यांनी सांगितले की, खाद्यतेलाबद्दल जे स्टॅण्डर्ड आहेत, त्याची तपासणी आता केली जाईल, या क्षेत्रामध्ये आता काम केले जाईल. नोंदणी न केलेल्या काही खाद्यतेल उत्पादक कंपन्या आम्हाला मिळाल्या आहेत, खाद्य तेलाची भेसळ करण्याचा प्रकार आम्हाला मिळाला. मोहरी तेल अनधिकृत मिश्रण केले जात आहे, याची परवानगी नाही. मुदत संपलेल्या तेलाच्या परत रिपॅकिंग केल्याचेही निदर्शनास आले आहे. खाद्यतेलाच्या स्टँडर्डसंदर्भाने आपण कपलायन्स ऑर्डर काढत आहोत. खाद्यतेलाच्या संदर्भात काम करणाऱ्या आस्थापनाना विविध मानके नियम लागू होतात. खाद्य तेलाच्या उद्योगात काम करणाऱ्या सर्वांना आदेश लागू असेल. किराणा दुकानदार ऑनलाइन विक्रेते, उत्पादनापासून ते विक्री करणाऱ्या प्रत्येकाला आदेश लागू असेल. त्यासाठी, 496 सेंट्रल लायन्सन रजिस्टर आहेत, अशी माहिती मुंढेंनी पत्रकार परिषदेतून दिली.

तसेच, खाद्यतेलाची विक्री सुट्या स्वरूपात करता येत नाही हा नियम आधीपासून आहे. पॅकेजिंगमध्येच खाद्य तेलाची विक्री केली जाईल. किरकोळ विक्रेत्यांनी सुद्धा सुट्टे स्वरूपात तेल घेऊ नये, असे आवाहन तुकाराम मुंढेंनी केले असून खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचे उल्लंघन केले तर 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आहे. भेसळ केल्यास 10 लाखापर्यत दंड आहे, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाखापर्यत दंड आहे, अशी माहितीही तुकाराम मुंढेंनी दिली. सुट्टे तेल विकत घेऊ नका, पॅकेज तेल आहे तर लेबल बघा, सील बंद आहे का चेक करा, त्याची मुदत बघा, एक्सपायरी डेट बघा. तळनीचं तेल वारंवार घरी सुद्धा वापरू नका आणि हॉटेलमध्ये सुद्धा वापरलं जात असेल तर तिथे खाऊ नका. हा इशू फक्त फसवणुकी पुरता मर्यादित नाही, आरोग्यावर याचा परिणाम होतोय. मेंदू विकार, कर्करोग, उच्च रक्तदाब असे आजार बळवतात, आरोग्याशी खेळणारे भेसळयुक्त तेल आहे, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी दिली आहे.

Tukaram Mundhe turns heat on adulterated edible oil sellers, minimum 7-year jail warning

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात