विशेष प्रतिनिधी
लातूर : कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके सध्या ‘स्कूल ठीक करो’ या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी करत आहेत. शाळांच्या दुरावस्थेला जबाबदार धरण त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Abhijit Dipke
लातूर येथे माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दीपके म्हणाले की, राज्यातील जेवढे मंत्री, आमदार आणि खासदार आहेत, त्यांनी आपल्या मुलांना एक दिवस खराब रस्त्यावरून पायी शाळेत पाठवले पाहिजे. जर असे केले तर त्यांना विद्यार्थ्यांच्या लक्षात समस्या येतील. कारण आम्ही शाळा बघायला येतोय म्हटल्यावर हे सगळे कामाला लागले. पण खराब रस्त्यामुळे साप चावून मुले मृत्यू पावली. सरकारच्या अपयशामुळे ही मुले मृत्यू पावली. उजनीच्या शाळेत आणि वर्गात देखील साप निघत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावले तर त्यांना प्रश्नावर भेटू. तसेच गावकऱ्यांना सोबत घेऊन शाळेच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवू, जेणेकरून तो आवाज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचेल. यासाठी गावकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन दीपके यांनी केले.
अभिजीत दीपके म्हणाले की, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसारखे याठिकाणी दादा भुसे हे शिक्षणमंत्री आहेत. पण आता ते म्हणतील मागच्या सरकारचे दोष आहे आणि आम्ही आता निवडून आलो आहोत. मात्र, तरीही जिल्हा परिषद शाळेतील परिस्थिती बदलली नाही. मुलांना बसायला बेंच नाहीत. मग तुम्ही दहा वर्षात केले काय? शाळेची अवस्था पाहून मला वाटते की, त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या पदावर राहू नये आणि राजीनामा दिला पाहिजे. तसेच शिक्षणमंत्री कोणीही असो त्यांची मुले सरकारी शाळेत पाठवावीत.
तसेच सरकारी शाळांमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेचे गांभीर्य जर सरकारला समजून घ्यायचे असेल, तर मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना याच शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवले पाहिजे. अनेक वर्षे सत्तेत असूनही, सरकारी शाळांच्या स्थितीत कोणताही लक्षणीय बदल घडवून आणण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरला आहे. त्यामुळे जर भविष्यात देखील शाळांची हीच परिस्थिती राहिली तर गावागावात आंदोलने उभी राहतील, असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App