शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये तीन तास बैठक; ‘सिल्व्हर ओक’वरील भेटीने राजकीय चर्चांना उधाण

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओक येथे तब्बल तीन तास महत्त्वपूर्ण बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काल रात्री सुमारे ८.१५ वाजता पार्थ पवार सिल्व्हर ओकवर दाखल झाले आणि रात्री ११.१५ वाजता ते तेथून बाहेर पडले. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Sharad Pawar and Parth Pawar

मात्र, राज्यातील राजकीय परिस्थिती, विविध विकासकामे आणि आगामी घडामोडींवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. बैठकीचा तपशील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेला नसल्याने या भेटीबाबत विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

पार्थ पवार केंद्रात जाणार?

दरम्यान, केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता असून, यावेळी अजित पवार यांच्या गटाला एक मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे. या मंत्रिपदासाठी पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीत या राजकीय घडामोडींबाबतही चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याला अद्याप कोणत्याही अधिकृत सूत्राने दुजोरा दिलेला नाही.



बारामतीतील विकासकामांवरही चर्चा?

पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीत बारामतीतील विविध विकासकामांवरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचे स्मारक उभारण्याच्या कामासह इतर विकास प्रकल्पांबाबतही बैठकीत चर्चा झाली असावी, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

१५ दिवसांनंतर आजोबा-नातवाची भेट

सुमारे १५ दिवसांपूर्वी दिल्लीत सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या रिसेप्शनचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला देशभरातील अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी पवार कुटुंबातील सदस्यांनीही उपस्थितांचे स्वागत केले होते.

या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि पार्थ पवार यांची झालेली ही पहिलीच भेट असल्याचे सांगितले जात आहे. तीन तासांच्या या बैठकीत नेमके काय ठरले आणि ‘आजोबांनी नातवाला’ काय सल्ला दिला, याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Three-hour meeting between Sharad Pawar and Parth Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात