Ishrat Jahan case : इशरत जहाँ प्रकरणात नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे होते टार्गेट वर!!; गृह मंत्रालयाच्या माजी अवर सचिवांचा धक्कादायक खुलासा

Ishrat Jahan case

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Ishrat Jahan case  काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीए राजवट किती घातक होती, त्या सरकारचे मनसूबे किती आत्मघातकी होते, यांचे एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी आज केले. मणी यांच्यासोबतचा ‘एएनआय’ (ANI) पॉडकास्ट प्रसिद्ध झाला. त्यातून त्यांनी देशविघातक कारवायांचा पाढा वाचला.Ishrat Jahan case

– आर. व्ही. एस. मणी म्हणाले :

– इशरत जहाँ प्रकरणात त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच टार्गेट वर होते. इशरत जहाँ ही दहशतवादी कारवायांमध्ये सामील होती.Ishrat Jahan case



– २०१० पर्यंत कोणत्याही फाईलमध्ये ‘हिंदू दहशतवाद’ (Hindu Terror) हा शब्दप्रयोगच नव्हता, पण काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मला हिंदू दहशतवादाची प्रकरणे शोधण्यास सांगितले होते; मी त्यांना सांगितले की अशी कोणतीही प्रकरणे नाहीत. त्यावर ते नाराज झाले.

– पाकिस्तानमधील लोकांना भारतीय सामरिक व्यवस्थेत कर्नल प्रसाद पुरोहित यांचे वर्चस्व वाढलेले नको होते. त्यामुळेच त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अडकविले गेले.

– २६/११ चार हल्ला त्यावेळची सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि कुविख्यात पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय (ISI) यांच्यातील एक “फिक्स्ड मॅच” (पूर्वनियोजित कट) होता. तुकाराम ओंबळे यांनी कसाबला पकडले नसते, तर आज या घटनेला “हिंदू दहशतवादी हल्ला” असेच म्हणायचा डाव होता.

– पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री बेअंत सिंग हत्या प्रकरणात भारत सरकारचा मी एकमेव साक्षीदार आहे.

आर. व्ही. एस. मणी यांच्या खुलाशांमुळे काँग्रेसच्या काळ्या कृत्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय.

Narendra Modi and Amit Shah were the targets in the Ishrat Jahan case!!; Shocking revelation by a former Under Secretary of the Home Ministry.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात