विशेष प्रतिनिधी
मुंबई : Andheri Station मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकल प्रवासादरम्यान एका प्रवाशाने केवळ मराठीत बोलण्याची मागणी केली म्हणून रेल्वेच्या तिकीट परीक्षकाने (TC) त्याला तब्बल एक तास कार्यालयात बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या उद्दाम वर्तणुकीवर मराठी नेटिझन्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.Andheri Station
मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रवासी लोकलने प्रवास करत असताना टीसीने त्याची तिकीट तपासणी केली. यावेळी प्रवाशाने, “तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात, तर मराठीत संवाद साधा,” असा आग्रही पवित्रा घेतला. यावरून तिथल्या अमराठी टीसीसोबत प्रवाशाचा वाद सुरू झाला.Andheri Station
हा वाद सुरू असतानाच, तिथे उपस्थित असलेल्या एका मराठी टीसीने अमराठी सहकाऱ्याची पाठराखण करण्यासाठी प्रवाशाशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या मराठी टीसीने प्रवाशाला उलट आणि अजब सवाल केले. “तुम्ही जर मराठीचा आग्रह धरता, तर मग मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप मराठीत का वापरत नाही? ते हिंदी आणि इंग्रजीत का वापरता? तुम्हाला मराठीची बाराखडी तरी येते का?” असा चढा आवाज करत या टीसीने प्रवाशाला थेट कॅमेऱ्यासमोर बाराखडी म्हणून दाखवण्याचे आव्हान दिले आणि त्याचे व्हिडिओ शुटिंग सुरू केले.
१ तास डांबले, गुन्हा दाखल करण्याची धमकी
संबंधित प्रवासी अत्यंत शांतपणे “महाराष्ट्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मराठी येणे गरजेचे आहे,” असे सांगत होता. मात्र, संतापलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, केवळ मराठीत बोलण्याचा आग्रह धरला म्हणून प्रवाशावर ‘सरकारी कामात अडथळा’ (IPC 353 सदृश) आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. सुरक्षेचा आणि कारवाईचा बहाणा करून त्या प्रवाशाला अंधेरी स्थानकातील एका कार्यालयात जवळपास तासभर कोंडून ठेवण्यात आले होते.
‘मराठी एकीकरण समिती’ आक्रमक; आरपीएफला वेढा
या अन्यायाची माहिती वाऱ्यासारखी पसरताच ‘मराठी एकीकरण समितीचे’ कार्यकर्ते तात्काळ अंधेरी पूर्व येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) कार्यालयाबाहेर जमा झाले. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रवाशाच्या तातडीच्या सुटकेसाठी कार्यालयात धडक दिली. “एखाद्या प्रवाशाने आपल्या मातृभाषेत किंवा राज्यभाषेत बोलण्याचा आग्रह धरला, तर तो सरकारी कामात अडथळा कसा ठरू शकतो?” असा संतप्त सवाल आता संघटना आणि सर्वसामान्य मुंबईकरांकडून रेल्वे प्रशासनाला विचारला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App