आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात भाजप – शिंदे सेनेच्या नेत्यांचे वेगवेगळे सूर; एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव!!

नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार का फुटले??, याविषयी याविषयी अनेक कारणे दिली गेली. अनेकांनी संजय राऊत यांच्या वाचाळ तोंडावर त्याचे खापर फोडले. यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आघाडीवर राहिले.

पण आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात मात्र भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांचे सूर एकदम वेगवेगळे राहिले. आदित्य वर आरोप करताना शिंदे सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला.

मनीषा कायंदे यांचा दावा

उद्धव ठाकरे यांनी खासदारांना विचारात न घेता त्यांच्या शिवसेनेत आदित्य ठाकरे यांचे महत्त्व वाढवून ठेवले होते. ते आजच्या त्यांच्या शिवसेनेच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करणार होते, तशी घोषणा करण्यासाठीच आजचा मेळावा घेतला होता. आदित्य ठाकरे यांनी कार्याध्यक्ष म्हणून आपल्यावर हुकूमत गाजवावी, हे खासदारांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून दिली, असा दावा शिंदे सेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केला. ५० कोटी, ५० खोकी वगैरे आरोपांच्या पलीकडला हा आरोप ठरला. त्यामुळे मराठी माध्यमांनी याचे वर्णन शिवसेनेच्या खासदारांच्या फुटीचे “सत्य” बाहेर आले, असे केले.



नितेश राणे यांचा आरोप

पण हे “सत्य” सुद्धा अर्धवटच ठरले. कारण भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात वेगळाच आरोप केला. उद्धव ठाकरे म्हणे, त्यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार होते. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस पद देण्याचे घाटत होते. उद्धव ठाकरे यांची ही खेळी त्यांच्या खासदारांना आवडली नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, असे त्यांच्या खासदारांना वाटले. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाऊन सहा खासदारांनी शिवसेनेतून फुटून आपला स्वतंत्र गट स्थापन केला, असा दावा नितेश राणे यांनी केला.

शिंदे सेना आणि भाजप यांच्यात समन्वयाचा अभाव

पण शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आदित्य ठाकरेंवर आरोप करताना समन्वय नसल्याचेच या दोन्ही वेगवेगळ्या आरोपांमधून दिसून आले. शिंदे सेनेचे आणि भाजपचे नेते एका सुरात आणि एका आवाजात संजय राऊत यांच्यावर बरसले पण आदित्य ठाकरेंवर आरोप करताना मात्र समन्वयाच्या अभावामुळे दोघांचे मार्ग वेगवेगळे झाल्याचे उघड्यावर आले. ऑपरेशन टायगर म्हणे फार निगुतीने म्हणजे काळजीपूर्वक केले गेले, पण “ऑपरेशन टायगरची” कारणे सांगताना आणि मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे यांना टार्गेट करताना शिंदे सेना आणि भाजप यांच्यातल्या समन्वयाच्या अभावाचे दर्शन घडले.

BJP and Shinde Sena leaders take different stances on allegations against Aditya Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात