नाशिक : शिवसेनेतील फूट, शिवसेनांच्या वर्धापन दिनावर मराठी माध्यमांचे लक्ष, पवारांच्या हालचालींच्या बातम्यांचीही भरमार; पण राहुल गांधींच्या वाढदिवसाकडे पूर्ण दुर्लक्ष!!, हेच राजकीय वास्तव आजच्या बातम्यांमधून समोर आले.
शिवसेनेतल्या खासदारांची फूट आणि त्या पार्श्वभूमीवर दोन शिवसेनांचा आजचा वर्धापन दिन या विषयावर मराठी माध्यमांनी सगळे लक्ष केंद्रित केले. त्याच अनुषंगाने शरद पवारांच्या राजकीय हालचालींच्या बातम्यांचीही भरमार केली. शिवसेनेचे सहा खासदार फुटले. आता त्या पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच खासदार फुटतील. शिवसेनेच्याच फुटीर खासदारांप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फुटीर खासदार सुद्धा भाजपच्या गोटाला जाऊन मिळतील, अशा आशयाच्या बातम्यांनी सगळी मराठी माध्यमे भरली. त्यावर क्रिया – प्रतिक्रियांच्या बातम्यांची भरमार झाली.
पण मराठी माध्यमांनी या सगळ्यांमध्ये आजच्या राहुल गांधींच्या वाढदिवसाच्या बातमीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले. वास्तविक उद्धव ठाकरेंचा पक्ष काय किंवा शरद पवारांचा पक्ष काय, दोन्ही प्रादेशिकच पक्ष. त्यांचे बळही तोकडे. मराठी माध्यमांच्या पलीकडे त्यांचा राजकीय प्रभाव देखील नाही. पण तरीसुद्धा मराठी माध्यमांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या बातम्यांवर भर दिला, पण ज्या राहुल गांधींच्या काँग्रेसचे 99 खासदार आहेत, जे राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्या वाढदिवसाकडे मात्र मराठी माध्यमांनी साफ दुर्लक्ष केल्याचेच दिसून आले. राहुल गांधींच्या आजच्या 57 व्या वाढदिवसाची मराठी माध्यमांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही. मराठी माध्यमांनी छोट्या प्रादेशिक पक्षांची दखल घेतली, पण काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाची आणि राहुल गांधींसारख्या बड्या नेत्याची दखल त्यांना घ्यावीशी वाटली नाही.
राहुल गांधींनी आपला आजचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काँग्रेसचे जुने 24 अकबर रोड हे कार्यालय निवडले. त्या कार्यालयात ते गेले. तिथे त्यांनी काँग्रेसच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांसह आपला वाढदिवस साजरा केला. वास्तविक काँग्रेसचे मुख्यालय आता 24 अकबर रोड येथे नाही. ते नव्या इंदिरा भवनात आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी सोनिया गांधींनी इंदिरा भवनाचे उद्घाटन करून तिथे काँग्रेसचे मुख्यालय देखील सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या सगळ्या महत्त्वाच्या बैठका सुद्धा तिथे झाल्या. पण राहुल गांधींनी मात्र आजच्या आपल्या वाढदिवशी जुन्या 24 अकबर रोड कार्यालयाची आठवण काढली आणि ती जपण्यासाठी ते तिथे पोहोचले. अर्थात काँग्रेसने जरी नवीन इंदिरा भवनात आपला राजकीय संसार थाटला असला तरी काँग्रेसने अकबर रोडवरच्या जुन्या कार्यालयाचा ताबा सोडला नाही, हेच राजकीय वास्तव यातून समोर आले. पण या वास्तवाकडे सुद्धा मराठी माध्यमांनी दुर्लक्ष केले.
#WATCH | Lok Sabha LoP Rahul Gandhi arrives at Congress office, in Delhi. He is celebrating his birthday today. pic.twitter.com/rUhzu1uPMn — ANI (@ANI) June 19, 2026
#WATCH | Lok Sabha LoP Rahul Gandhi arrives at Congress office, in Delhi. He is celebrating his birthday today. pic.twitter.com/rUhzu1uPMn
— ANI (@ANI) June 19, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App