WhatsApp DP Scam : WhatsAppवर डीपी बदलून 7.8 कोटींची फसवणूक! माजी पंतप्रधानांच्या मुलालाही सायबर ठगांनी गंडवले; 4 कोटींची रक्कम गोठवली

WhatsApp DP Scam

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : WhatsApp DP Scam  देशातील एका माजी पंतप्रधानांच्या कुटुंबालाही सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचे पुत्र आणि माजी राज्यसभा खासदार नरेश गुजराल यांच्या कंपनीची तब्बल 7.8 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण फसवणूक केवळ व्हॉट्सअॅपवरील एका बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून करण्यात आली.WhatsApp DP Scam

बॉसच्या फोटोचा वापर करून रचला कट

मिळालेल्या माहितीनुसार, नरेश गुजराल यांच्या कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅप संदेश आला. त्या क्रमांकावरील प्रोफाइल फोटो नरेश गुजराल यांचाच असल्याने संबंधित अधिकाऱ्याला संदेश खरोखरच त्यांच्या वरिष्ठांकडून आल्याचा विश्वास बसला.WhatsApp DP Scam



संदेशात तातडीने एका बँक खात्यात मोठी रक्कम हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुरुवातीला सुमारे दीड कोटी रुपये आरटीजीएसद्वारे पाठवण्यास सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्याने कोणताही संशय न घेता ती रक्कम पाठवली.

चार दिवसांत काढले तब्बल 7.8 कोटी रुपये

पहिल्या व्यवहारानंतर ठगाने पुढील चार दिवस सातत्याने विविध कारणे सांगत आणखी पैशांची मागणी केली. प्रत्येक वेळी वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या सूचनांचे पालन केले. अशा प्रकारे हप्त्याहप्त्याने कंपनीच्या खात्यातून एकूण 7.8 कोटी रुपये संबंधित खात्यात वर्ग करण्यात आले.

सायबर गुन्हेगारांनी घाईगडबडीत पैसे उकळण्याऐवजी आधी विश्वास संपादन केला आणि त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने मोठी रक्कम लाटली, असे तपासातून समोर येत आहे.

बँक आणि मुख्य वित्त अधिकारीही फसले

इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने संबंधित बँकेला संशय आला. बँकेने कंपनीच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याशी संपर्क साधून व्यवहारांची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही हे आदेश नरेश गुजराल यांच्याकडूनच आले असावेत असे वाटल्याने व्यवहार सुरूच राहिले.

यामुळे फसवणूक आणखी वाढत गेली आणि कोट्यवधी रुपयांची रक्कम ठगाच्या खात्यात जमा झाली.

मुलीला फोन केल्यानंतर उघडकीस आला प्रकार

या प्रकरणाला नाट्यमय वळण 16 जून रोजी मिळाले. कंपनीतील संबंधित अधिकाऱ्याला काहीसा संशय आल्याने त्याने नरेश गुजराल यांच्या कन्या दीक्षा गुजराल यांच्याशी संपर्क साधला. “तुमच्या वडिलांच्या सूचनेनुसार पैसे पाठवत आहोत,” असे त्याने सांगितले.

हे ऐकताच दीक्षा गुजराल यांना धक्का बसला, कारण नरेश गुजराल यांनी अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या. त्यानंतर संपूर्ण प्रकार सायबर फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.

दिल्ली पोलिसांची तातडीची कारवाई

घटना समोर आल्यानंतर तत्काळ ई-एफआयआर दाखल करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष सायबर तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. ज्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले होते, त्या खात्याचा मागोवा घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये फसवणुकीची रक्कम काही मिनिटांत अनेक खात्यांमध्ये वळती केली जाते. मात्र या प्रकरणात मोठा हिस्सा अद्याप मूळ खात्यातच असल्याचे आढळून आले.

तपासादरम्यान सुमारे 4 कोटी रुपयांची रक्कम शोधून काढण्यात आली असून ती गोठवण्यात आली आहे. उर्वरित रकमेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सायबर फसवणुकीची नवी पद्धत

या घटनेमुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर मोठे उद्योगपती, राजकारणी आणि वरिष्ठ अधिकारीदेखील सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ प्रोफाइल फोटो आणि ओळखीच्या व्यक्तीचे नाव वापरून विश्वास संपादन करणे, त्यानंतर तातडीच्या व्यवहारांच्या नावाखाली पैसे उकळणे, ही सायबर ठगांची नवी आणि अत्यंत धोकादायक पद्धत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

त्यामुळे कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खातरजमा करणे आवश्यक असल्याचा इशाराही या घटनेनिमित्ताने देण्यात येत आहे.

WhatsApp DP Scam: Former PM’s Son Naresh Gujral Duped of Rs 7.8 Crore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात