वृत्तसंस्था
कोलकाता : Abhishek Banerjee तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे शनिवारी हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी गेलेल्या बॅनर्जी यांच्यावर संतप्त जमावाने दगडफेक, अंडीफेक आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.Abhishek Banerjee
घटनेदरम्यान अभिषेक बॅनर्जी यांच्या अंगावरील शर्ट फाटला. परिस्थिती बिघडताच पोलिसांनी त्यांना संरक्षण देत तेथून बाहेर काढले. काही व्हिडिओंमध्ये ते सुरक्षेसाठी हेल्मेट घालून जाताना दिसत आहेत. दगड, अंडी आणि चपला फेकण्यात आल्याचेही वृत्त आहे.Abhishek Banerjee
‘मला ठार मारण्याचा प्रयत्न झाला’
हल्ल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “हा अचानक झालेला प्रकार नव्हता. मला ठार मारण्याचाच प्रयत्न करण्यात आला. माझ्या डोळ्याजवळ विटेचा तुकडा लागला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. संपूर्ण घटना चित्रित झाली असून याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बॅनर्जी यांनी या हल्ल्यामागे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र भाजपने हे आरोप फेटाळून लावत हा स्थानिक नागरिकांच्या संतापाचा उद्रेक असल्याचे म्हटले आहे.
ममता बॅनर्जी संतप्त; राज्यभर आंदोलनाची घोषणा
हल्ल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत राज्यभर आंदोलनाची घोषणा केली. तृणमूल काँग्रेसकडून रविवारीपासून विविध ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षांकडूनही निषेध
या हल्ल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही निषेध केला आहे. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र हिंसाचाराचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
निवडणुकीनंतर बंगालमध्ये तणाव कायम
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक भागांत राजकीय संघर्ष आणि हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला राज्यातील वाढत्या राजकीय तणावाचे आणखी एक गंभीर उदाहरण मानला जात आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App