विधान परिषदेवर एकही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर; काँग्रेस ८, राष्ट्रवादी (शप) ३, ठाकरे सेना ४!!

tutari

 

नाशिक : विधान परिषदेवर एकाही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीने आपासांत जागावाटप करून घेतले. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आठ, राष्ट्रवादी (शप)ला तीन, तर ठाकरे सेनेला चार जागा वाट्याला आल्या.Maha Vikas Aghadi, which could not get a single MLA elected to the Legislative Council; Congress 8, NCP (ShP) 3, Thackeray Sena 4!!

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून देणाऱ्या 17 जागांसाठी महायुतीतल्या पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच असून भाजपने शिंदे सेना आणि सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी यांना चांगलेच मागे रेटले आहे. कारण भाजपकडे सगळ्यात जास्त आमदार निवडून आणण्यासाठी संख्याबळ आहे. त्यांच्या पाठोपाठ शिंदे सेनेकडे संख्याबळ आहे. भाजपच्या बळावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले एक – दोन उमेदवार निवडून येण्याची स्थिती आहे.



– फार मोठ्या वाटाघाटी केल्याचा आव

त्या उलट महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाकडे आमदार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नाही. तरीसुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी फार मोठ्या वाटाघाटी करून महाविकास आघाडीचे विधान परिषद निवडणुकीतले जागावाटप जाहीर केले. या जागावाटपा नुसार काँग्रेसच्या वाट्याला आठ जागा आल्या असून त्यामध्ये विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा – गोंदिया, नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, बीड – लातूर अमरावती आणि सोलापूर या जागांचा समावेश आहे.

– पवारांच्या वाट्याला तिसरे स्थान

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे, सातारा – सांगली, ठाणे – पालघर अशा तीन जागा आल्यात, तर ठाकरे सेनेकडे छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी – हिंगोली, जळगाव रायगड, रत्नागिरी – सिंधुदुर्ग या जागा वाट्याला आल्यात. एकूण 17 पैकी 15 जागांचा तिढा सुटला असून दोन जागांवर वाद कायम आहेत.

– महायुतीवर फुकाची कुरघोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर विधान परिषद निवडणूक होणार असल्याने महाविकास आघाडीचे सगळे गणित बिघडून गेले. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना जोरदार दणका बसला. त्यामुळे १७ पैकी त्यांचा एकही आमदार निवडून येण्याची शक्यता नाही. तरीसुद्धा महायुतीवर कुरघोडी करण्यासाठी महाविकास आघाडीने सगळ्या जागांवर उमेदवार उभे करून आपापसातले जागावाटप जाहीर करून टाकले. पण नुसते जागावाटप महाविकास आघाडीला एकही आमदार मिळवून देऊ शकणार नाही.

Maha Vikas Aghadi, which could not get a single MLA elected to the Legislative Council; Congress 8, NCP (ShP) 3, Thackeray Sena 4!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात