डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रात भारत – सायप्रस मैत्री अधिक मजबूत; महाराष्ट्र $660 अब्ज अर्थव्यवस्थेचे राज्य!!

Maharashtra

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘सायप्रस-इंडिया बिझनेस फोरम’मध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली.India-Cyprus friendship strengthens in the field of digital economy and industry; Maharashtra is a state with a $660 billion economy!!

सायप्रसच्या उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी, तसेच उत्पादन, नवोपक्रम आणि व्यापार क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी निर्माण करावी. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत आणि सायप्रस यांचे संबंध लोकशाही, सार्वभौमत्व आणि शांततामय सहअस्तित्व या समान मूल्यांवर आधारित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये केलेल्या सायप्रस दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळाले असून आर्थिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

– महाराष्ट्र $660 अब्ज अर्थव्यवस्थेचे राज्य

महाराष्ट्र हे आज $660 अब्ज अर्थव्यवस्थेचे राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. मुंबई हे जगातील वेगाने विकसित होणारे आर्थिक केंद्र बनत असून राज्यात अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो नेटवर्क, लॉजिस्टिक पार्क आणि स्मार्ट शहरांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून निर्माण होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय एज्यु सिटी, मेडी सिटी आणि जीसीसी सिटीसारखे जागतिक दर्जाचे प्रकल्पही उभारले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

– साखरी वाहतूक, लॉजिस्टिक्समध्ये सायप्रसची ताकद

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सायप्रस हे युरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्यपूर्वेसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा आणि नवोपक्रम क्षेत्रात सायप्रसची मोठी ताकद असून महाराष्ट्र आणि भारत हे जागतिक आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरेल. फिनटेक आणि डिजिटल व्यवहार क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर आदर्श निर्माण केला असून भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे अब्जावधी व्यवहार सुरक्षितपणे होत आहेत. सायप्रसच्या युरोपीय वित्तीय नेटवर्क आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील सहकार्यामुळे सीमापार वित्तीय व्यवहार आणि डिजिटल नवोपक्रमासाठी नवे मार्ग खुले होतील.

कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, संशोधन, शिक्षण आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्रात येणारे जागतिक गुंतवणूकदार हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यात गुंतवणूक करत आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंध आशादायी असून भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागर हे व्यापार, तंत्रज्ञान आणि सामरिक सहकार्याद्वारे अधिक जवळ येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (CCCI)चे अध्यक्ष स्टावरोस स्टावरू, इन्व्हेस्ट सायप्रसचे अध्यक्ष एव्हजेनिओस एव्हजेनिओ, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)चे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा द सन्मार ग्रुपचे अध्यक्ष विजय शंकर, सीआयआयच्या राष्ट्रीय कौशल्य आणि उपजीविका समितीचे अध्यक्ष तथा ब्ल्यू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

India-Cyprus friendship strengthens in the field of digital economy and industry; Maharashtra is a state with a $660 billion economy!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात