विशेष प्रतिनिधी
मुंबई : सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायप्रस – इंडिया बिझनेस फोरम येथे विविध संस्थांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आले.
सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)
इन्व्हेस्ट सायप्रस आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)
आयजीसी बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कौन्सिल आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)
सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII)
सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स आणि सायप्रस डिफेन्स अँड स्पेस इंडस्ट्री क्लस्टर
सप्तंग लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चॅनेल आयटी लिमिटेड ( Channel IT Ltd.)
या करारांमुळे संरक्षण, गुंतवणूक, सायबर सुरक्षा आणि व्यापार विकास या क्षेत्रांमध्ये भारत व सायप्रसचे संबंध अधिक दृढ होतील.
यावेळी सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (CCCI) अध्यक्ष, स्टावरोस स्टावरू, इन्व्हेस्ट सायप्रसचे अध्यक्ष एव्हजेनिओस एव्हजेनिओ, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चे वरिष्ठ उपाध्यक्ष व द सन्मार ग्रुपचे अध्यक्ष विजय शंकर, सीआयआयच्या राष्ट्रीय कौशल्य आणि उपजीविका समितीचे अध्यक्ष व ब्ल्यू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App