वृत्तसंस्था
अहमदाबाद : ISIS Bio देशात ‘जैविक दहशतवादी हल्ल्याचा’ म्हणजेच बायो-टेररिझमचा धोका वाढत चालला आहे. एनआयएने आयएसआयएसशी संबंधित एका बायो-टेरर प्लॉटमध्ये डॉक्टरसह तीन जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे लोक सार्वजनिक ठिकाणी जैविक टॉक्सिनच्या माध्यमातून हजारो लोकांना विष देण्याचा कट रचत होते,असा आरोप आहे.ISIS Bio
आरोपपत्रात हैदराबादचे डॉ. सय्यद अहमद मोहीउद्दीन व उत्तर प्रदेशचे आझाद व मोहम्मद सुहेल यांची नावे आहेत. हे आरोपपत्र गुजरातच्या अहमदाबादमधील स्पेशल एनआयए कोर्टात दाखल केले आहे. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, आरोपी आपापल्या आयएसआयएसशी संबंधित विदेशी हँडलर्सच्या सूचनेनुसार मिळून काम करत होते. ते हँडलर्सकडून कट्टरपंथी बलेल्या तरुणांची भरती करून जिहादचे समर्थन व बायो टेररिझमद्वारे दहशत पसरवण्याची योजना आखत होते.ISIS Bio
घरातच बनवली होती लॅब
एनआयएने जानेवारी २०२६ मध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, मोहिउद्दीनला त्याच्या हँडलरने दक्षिण आशियातील आयसिसचा ‘अमीर’ (म्होरक्या) बनवण्याचे आश्वासन दिले. त्याने हैदराबादमधील घराचे रूपांतर ‘रायसिन’ तयार करण्यासाठी एका गुप्त लॅबमध्ये केले होते.
आझाद आणि सुहेल कथितपणे राजस्थानच्या हनुमानगडमधील एका ठिकाणाहून रोख रक्कम आणि प्रतिबंधित शस्त्रास्त्रांनी भरलेले पार्सल गोळा करत होते. त्यांनी हे पार्सल गुजरातच्या छत्रालमधील एका ठिकाणी जमा केले होते.
बायो-टेररिझम म्हणजे काय: लोक, प्राणी किंवा पिकांना जाणीवपूर्वक हानी पोहोचवण्यासाठी बॅक्टेरिया, व्हायरस वा विषारी पदार्थांचा वापर करणे.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आझाद व सुहेल यांच्या कामात हँडलर्सशी संपर्क राखणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी व्यवस्थापन, रेकी करणे आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे यांचा समावेश होता. सुहेलला हँडलर आणि इतर सदस्यांमधील मुख्य दुवा असल्याचे सांगण्यात आले आहे. एजन्सीच्या माहितीनुसार, तो गोष्टी व्हिडिओवर रेकॉर्ड करत असे. त्याने आयसिसचे झेंडेही तयार केले होते.
पूर्वी एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया घातक बनवण्याची माहिती लपवून ठेवली जात असे. आता सामान्य वापरकर्ता एआयला विचारू शकतो की वेगात पसरणारा विषाणू पसरण्यासाठी कसा बदल करावा.
जेनेटिक डिझाइन तयार करणे
एखाद्या आजाराचा डीएनए पुन्हा लिहिणे हे सर्वात कठीण काम असायचे. आता एआय स्वतः असे जेनेटिक कोड तयार करू शकतो जे सामान्य व्हायरसला विषासारखे धोकादायक बनवू शकतील.
सुरक्षा तपासणीला चकवा देणे
बायोलॉजिकल सामान पाठवणाऱ्या कंपन्या स्क्रीनिंग करतात जेणेकरून धोकादायक व्हायरस मागवू नये. परंतु, एआय असे मार्ग सांगू शकतो ज्यामुळे धोकादायक कोड तुकड्यांत वा बदलून मागवता येतील, ज्यामुळे ते तपासणीत येणार नाहीत.
चुका सुधारणे : लॅबमध्ये प्रयोग अपयशी ठरतात. एआय ‘लाईव्ह कोच’प्रमाणे चूक सांगू शकतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App