Ashok Kharat : भोंदू खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला; पाचव्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी; व्हीसीद्वारे सुनावणी

Ashok Kharat

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Ashok Kharat  नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा पोलिस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, रविवारी (दि. १९) ‘एसआयटी’ने (SIT) त्याला पाचव्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.Ashok Kharat

अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या पापाचा पाढा वाचताना पोलिसही चक्रावून गेले आहेत. यातील ८ गुन्हे हे थेट महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर उर्वरित ७ गुन्हे खंडणी, बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत. एका बाजूला पोलिस कोठडीतून सुटका होत नाही, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) खरातच्या १०० कोटींहून अधिक मालमत्तेची आणि आर्थिक साम्राज्याची मुळे खणून काढण्यास सुरुवात केल्याने त्याच्या अडचणीत दुपटीने वाढ झाली आहे.Ashok Kharat



कोर्टात काय घडले?

अशोक खरात याला पाचव्या गुन्ह्यासाठी कोर्टासमोर हजर केले होते. आजची ही महत्त्वाची सुनावणी सुरक्षेच्या कारणास्तव ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडीची गरज स्पष्ट करताना महत्त्वाचा मुद्दा मांडला. “आरोपीची पद्धत एकच असली, तरी प्रत्येक पीडित महिला वेगळी आहे. महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. ते द्रव्य कुठून आणले आणि यामागे कोणाचे मोठे षडयंत्र आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक आहे,” असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी ही मागणी खोडून काढताना सांगितले की, पोलिस तेच जुने मुद्दे मांडून पुन्हा पुन्हा कोठडी मागत आहेत. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितांची वाढती संख्या विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

खरातचे डोके दुखायचे थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही

दरम्यान, अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टाकडे एक मागणी केली आहे. अशोक खरातच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे, त्याचे डोकेही दुखत आहे. त्याच्या वेदनांवर पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे खरातला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना आवश्यक ते औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अद्याप ११ गुन्ह्यांची चौकशी बाकी

आतापर्यंत अशोक खरातच्या केवळ ४ गुन्ह्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. उर्वरित ११ गुन्ह्यांमध्ये अद्याप त्याची सखोल चौकशी होणे बाकी आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पाचव्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला आता पोलिस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. एसआयटीने खरातच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे मोठे दुवे समोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Case: Godman Sent to 5-Day Police Custody in 5th FIR

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात