Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या फरार पत्नीच्या विरोधात लुकआऊट नोटीस; देशातील सर्व विमानतळांवर पोलिसांची नजर

Ashok Kharat

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Ashok Kharat  शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक पीडित महिला आता धैर्याने पुढे येऊन त्याच्याविरुद्ध तक्रारी नोंदवत असून, यामध्ये केवळ लैंगिक शोषणाचेच नव्हे तर आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हेही समोर येत आहेत. खरात हा बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या काळ्या धंद्यात त्याची पत्नी कल्पना खरात हिचादेखील सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.Ashok Kharat

या प्रकरणात सहआरोपी म्हणून नाव येताच कल्पना खरात फरार झाली असून पोलिस तिचा कसून शोध घेत आहेत. ती देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी प्रशासनाने आता तिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. या नोटिसीमुळे तिचा परदेशात पळण्याचा मार्ग आता पूर्णपणे बंद झाला असून, पोलिस लवकरच तिला बेड्या ठोकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.Ashok Kharat



अशोक खरातनेही परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता

शिर्डीत शेतकरी फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीच्या गुन्ह्यात अडकलेली भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरात हिच्याविरोधात शिर्डी पोलिसांनी आता ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार असून पोलिस तिचा कसून शोध घेत आहेत. यापूर्वी अशोक खरातनेही परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, जो पोलिसांनी हाणून पाडला होता. आता त्याची पत्नीदेखील देशाबाहेर पलायन करण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कडक पाऊले उचलली आहेत.

देशातील सर्व विमानतळांवर कल्पना खरातची माहिती

लुकआऊट नोटीस जारी झाल्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर कल्पना खरातची माहिती देण्यात आली असून, तिच्या परदेश प्रवासावर पूर्णपणे बंदी आली आहे. पोलिसांनी तिची सर्व बाजूंनी नाकेबंदी केली असून कोणत्याही मार्गाने ती देश सोडू शकणार नाही याची खबरदारी घेतली आहे. या कारवाईमुळे फरार आरोपी कल्पना खरातच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलिसांना मोठे यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

कल्पना खरातवर जमीन बळकावल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा

शिर्डी येथील 4 एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातसह पाच जणांविरुद्ध शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खरात कुटुंबाने त्यांना व्याजाने पैसे देऊन सावकारी पाशात ओढले आणि कर्जफेडीच्या बहाण्याने त्यांची जमीन बळकावली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Lookout Notice Issued Against Ashok Kharat’s Absconding Wife Kalpana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात