भाषा तोंडात पुरोगामी, पण “पवार संस्कारित” लागले भोंदू बाबांच्या नादी!!

नाशिक : भाषा तोंडात पुरोगामी, पण पवार संस्कारित लागले भोंदू बाबांच्या नादी!!, असेच म्हणायची वेळ अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात आली. Rupali chakankar

महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महिला दिनानिमित्त भाषण करताना, प्रतिगामी प्रवृत्तीने महिलांना पोथ्या पुराणांमध्ये अडकवून ठेवले. आम्ही महिलांनी आता त्या मोठ्या पुराणांमधून बाहेर पडले पाहिजे, अशी पुरोगामी भाषा वापरली होती. शरद पवारांनी राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पुरोगामी संस्कार केल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले होते.

– रूपाली चाकणकर यांच्या विरोधकांना संधी

पण रूपाली चाकणकरांचे ते पुरोगामी भाषण होऊन आठच दिवस उलटले नाही तोच, भाषा तोंडी पुरोगामी, पण पवार संस्कारित लागले भोंदू बाबांच्या नादी!! हे राजकीय सत्य बाहेर आले. मंत्र तंत्राच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचे कारनामे बाहेर आले. त्यात एकनाथ शिंदे यांच्यापासून ते रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत बरीच नावे अडकली. त्यातही रूपाली चाकणकर यांनी भोंदू बाबा अशोक खरात याचे पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रूपाली चाकणकरांच्या विरोधकांनी उचल खाल्ली. रूपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरी आणि सुषमा अंधारे यांना आयती संधी मिळाली. रूपाली चाकणकरांच्या विरोधात या सगळ्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरीस त्यांच्यावर कारवाई करणे भाग पाडले.



– प्रफुल्ल पटेलांचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना यांना रूपाली चाकणकरांवर एक दोन दिवसांत कारवाई करायचे आश्वासन द्यावे लागले. पण याच दरम्यान रूपाली चाकणकर फरारी झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या. रूपाली ठोंबरे पाटलांनी तसा आरोप केला.

या सगळ्या प्रकरणातून पवारांचे पोकळ पुरोगामी संस्कार सगळ्या महाराष्ट्राला दिसले. तुम्ही पूजता त्या मूर्ती आम्ही घडवतो आणि साल्यांनो तुम्ही आम्हाला दर्शन घेऊ देत नाही, असे शरद पवार मोठ्या पुरोगामी भाषणात म्हणाले होते. पवारांच्या त्या संस्कारांमधूनच धडा घेऊन रूपाली चाकणकरांनी महिलांना पोथ्या पुराणांमधून बाहेर यायचा पुरोगामी सल्ला दिला होता. पण याच “पवार संस्कारित” रूपाली चाकणकर अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाच्या नादी लागल्याचे वास्तव समोर आल्यानंतर मात्र फरारी झाल्याच्या बातम्या आल्या. आता तर त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर “संक्रांत” आली.

Rupali chakankar’s involvement in Ashok kharat case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात