CM Devendra Fadnavis : सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी

CM Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Devendra Fadnavis अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. या योजनेनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे.CM Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी राबावण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठित केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे.CM Devendra Fadnavis



पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड केली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसितील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता, त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहे.

कृषी संलग्न केंद्र आणि ग्रामीण विकास

कृषी संलग्न केंद्र आणि ग्रामीण विकास या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा कृषी जीडीपी सन 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. बळीराजाला केंद्रस्थानी ठेऊन शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी 10-15 पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करण्यात येईल. शेतकऱ्यांना सुलभतेने सेवा देण्यासाठी महावेद, महाडीबीटी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

कृषीक्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणार

अर्थमंत्री फडणवीस म्हणाले, कृषीक्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा तयार केल्या जाणार आहेत. 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार केली जाईल. 2 वर्षांत महाराष्ट्र शेती नैसर्गिक अभियान या नव्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात येईल.

Maharashtra CM Devendra Fadnavis Farmer Loan Waiver 2026: ₹2 Lakh Relief Announced VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात