शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 60 वर्षे; सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोशल मीडिया पोस्ट, पण “विलीनीकरण” हा शब्दच नाही त्यात…!!

Sharad Pawar

नाशिक : शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीने आज साठी मध्ये पदार्पण केले. 1967 मध्ये ते विधानसभेवर निवडून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या संसदीय निवडणुकीत एकदाही पराभव झाला नाही. ते संसदीय परंपरेतल्या विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांचे सदस्य राहिले. बारामती पासून ते दिल्ली पर्यंत शरद पवार हे व्यक्तिमत्व कायम माध्यमांच्या चर्चेत राहिले. पंतप्रधान पदाची स्पर्धेपासून ते राज्यसभा सदस्यत्वासाठी धडपड या सगळ्या पातळ्यांवर शरद पवारांची चर्चा झडली.Sharad Pawar’s parliamentary debut entrance 60 s

शरद पवारांच्या संसदीय कारकीर्द साठाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून त्यांना शुभेच्छा दिल्या, पण सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोशल मीडिया पोस्टचे वैशिष्ट्य असे की, त्यामध्ये दोघांनीही दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबद्दल एकही शब्द लिहिला नाही. दोघांनीही शरद पवारांच्या संसदीय कारकीर्दीबद्दल अभिमान वाटतो, असे लिहिले. त्यांच्याकडून सगळ्यांना प्रेरणा मिळावी असेही लिहिले, पण दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची सर्वत्र चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोन निर्णयक महत्त्वाच्या नेत्यांनी “विलीनीकरण” हा शब्द सुद्धा आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिला नाही.



– सुप्रिया सुळे यांची पोस्ट अशी :

– आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा, तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत निवडून गेले, तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सन १९६७ साली आजच्या दिवशी सुरू झालेला हा अविजीत प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे जीवाभावाचे सोबती, कार्यकर्ते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभे राहिले. जनतेने आदरणीय त्यांच्यावर अलोट प्रेम केले, प्रचंड विश्वास टाकला. या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला आहे. याबद्दल या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. धन्यवाद.

– प्रफुल्ल पटेल यांची पोस्ट अशी :

– राजकारण आणि समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सार्वजनिक आणि संसदीय कारकीर्दीला आज साठ वर्षे होत आहेत. १९६७ मध्ये एका तरुण नेतृत्वाच्या रूपाने सुरू झालेला हा प्रवास, आज सहा दशकांनंतरही तितक्याच अदम्य ऊर्जेने सुरू आहे. बारामतीपासून दिल्लीपर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना, पवार साहेबांनी तळागाळातील माणसाशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. आज साठ वर्षांनंतरही त्यांचा तोच उत्साह, तीच कामाची जिद्द आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण पाहून थक्क व्हायला होते. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांची ही ऊर्जा आगामी काळातही सर्वांना प्रेरणा देत राहो. संसदीय कारकिर्दीच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पवार साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

– राजकीय वास्तव

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या निर्णयक महत्त्वाच्या नेत्यांनी विलीनीकरणासंदर्भात काहीही लिहिले नाही किंबहुना विलीनीकरण हा शब्द सुद्धा आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिला नाही, याचा अर्थ विलीनीकरणाची चर्चा करणारे नेते आणि माध्यमे वास्तवापासून किती दूर आहेत, हेच स्पष्ट होते.

Sharad Pawar’s parliamentary debut entrance 60 s

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात