केंद्रीय अर्थसंकल्पाने उघडला युवकांसाठी पेटारा; शिक्षण, संशोधन, रोजगार, क्रीडा क्षेत्रांसाठी तरतुदींचा झरा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 1 फेब्रुवारीला 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी युवकांसाठी पेटारा उघडला. शिक्षण संशोधन रोजगार आणि क्रीडा क्षेत्रांसाठी तरतुदींचा झरा वाहिला. निर्मला सीतारमण यांनी आज नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. तत्पूर्वी अर्थमंत्री सीतारमण यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आणि त्यानंतर सकाळी 11.00 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला.

– जगातल्या चौथ्या अर्थव्यवस्थेचा अर्थसंकल्प

भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि पुढील दोन वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे, अशा वेळी सरकारसमोर अनेक मोठे आर्थिक आव्हाने आहेत. दरम्यान देशातील सर्वांच्या नजरा लागलेल्या या केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार, शिक्षण आणि युवकांसाठी नेमक्या काय तरतुदी करण्यात आल्यात हे जाणून घेऊ.

– रोजगार, शिक्षण, युवकांसाठी काय??

महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याचा फायदा विणकर आणि कुटीर उद्योगांना होईल. गरीब ग्रामीण तरुणांना याचा फायदा होईल. भारताकडे क्रीडा-संबंधित उत्पादने विकसित करण्याची क्षमता आहे. सोबतच देशात तीन मोठ्या केमिकल पार्कची निर्मिती करणार. हातमाग, वस्त्रोद्योग, हस्तकलेला चालना देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेची घोषणा यावेळी निर्मला सीताराम यांनी केली आहे.

3 केमिकल पार्कची निर्मिती

देशात तीन मोठ्या केमिकल पार्कची निर्मिती करणार. मेगा टेक्स्टाईल उभारणी करणार, देशात तीन बायफॉर्मासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लघु उद्योग, विकासाची नवे शहरे आधारित केंद्र स्थापन करत आहोत. महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना राबवतोय ज्यातून एक जिल्हा एक उत्पादन आणि ग्रामीण भागातील तरुणांना ट्रेनींग आणि उद्योग देणार आहोत. खेळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनावर भर देणार आहोत. बायो फार्मातील संशोधन वाढवण्यासाठी 3 नवीन शैक्षणीक संस्था उभ्या करणार. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेशीम, ताग आणि लोकरसाठी राष्ट्रीय फायबर योजनेची घोषणा केलीय.

– मेडिकल टुरिझम हब

भारताला मेडिकल टुरीझम केंद्र बनवणार, देशात 5 ठिकाणी मेडिकल हब उभारले जाणार, सोबतच भारताला औषध निर्मितीचे हब बनवू, देशात 3 नवीन आयुष आयुर्वैदीक कॉलेज उभे करणार. जामनगरच्या WHO केंद्राला विकसीत करणार. पाच युनिव्हर्सिटी टाऊनशिप उभे करणार, मेडिकल टुरिझम प्रमोट करण्यासाठी देशात 5 हब विकसित करणारप्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षणासाठी मुलींची वसतिगृह उभारणार, मुंबईत एबीजीसीची कंटेट क्रिएटिव्ह लॅब विकसित करणार, डिझाईन क्षेत्राला चालना देणारा, सरकारने AI मिशन, R&D प्रकल्प हाती घेतले आहेत. सोबतच तरुणांसाठी आरोग्य संस्थेत आम्ही काही तंत्रज्ञानात भर घालणार आहोत. अशी घोषणा निर्मला सीताराम यांनी केली आहे.

– खगोलशास्त्र संशोधनाला प्रोत्साहन

खगोलशास्त्राला प्रोत्साहन दिले जाईल. 20,000 तरुणांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित केले जाईल. कंटेंट क्रिएटर लॅबची स्थापना केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 3 नवीन अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही 22 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आमच्या सरकारने सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षणापासून रोजगारापर्यंत उद्योग स्थापन केले पाहिजेत, असा आमचा मानस असल्याचेही त्या म्हणाल्या.

– 5 विद्यापीठांच्या टाऊनशिप चा विकास

देशाच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात एक प्रमुख घोषणा म्हणजे देशभरातील पाच विद्यापीठ टाउनशिपचा विकास. या टाउनशिपमध्ये शैक्षणिक, संशोधन, वसतिगृहे, क्रीडा आणि स्टार्टअपसाठी एकच सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना असे वातावरण प्रदान करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे जिथे ते त्यांचा अभ्यास करत असताना नवीन कल्पना आणि नवोपक्रमांवर काम करू शकतील. याव्यतिरिक्त, देशभरात पाच नवीन विद्यापीठे उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे उच्च शिक्षणाची सुविधा सुलभ होईल आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

– खेलो इंडिया मिशनला चालना

खेलो इंडिया मिशन स्थापन केले जाईल. पुढील 10 वर्षांत या उपक्रमांतर्गत काम केले जाईल. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली जातील. प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना पद्धतशीरपणे प्रशिक्षित केले जाईल. स्पर्धा आणि लीग आयोजित केल्या जातील. प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी क्रीडा पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. अशी घोषणा निर्मला सीताराम यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात