वृत्तसंस्था
नवी दिल्ली : NIA Finds दिल्लीत लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने एनआयएने अटक केलेले संशयित डॉ. आदिल राथेर आणि मदतगार जसीर बिलाल वानी यांना दक्षिण काश्मीरमधील ४ घनदाट जंगलात नेले. ही तीच ठिकाणे आहेत, जिथे दोघांनी कथितरित्या दहशतवाद्यांशी भेट घेतली होती आणि स्फोटापूर्वी दारूगोळ्याची चाचणी केली होती.NIA Finds
अधिकाऱ्यांनुसार, दोघांना मट्टन आणि काजीगुंडच्या जंगलात नेण्यात आले. ही ठिकाणे अनंतनागमध्ये डॉ. आदिलच्या घराच्या जवळ आहेत. या जंगलांचा वापर आरोपी दहशतवाद्यांसोबत भेटी घेण्यासाठी आणि स्फोटक उपकरणांसह प्रयोग करण्यासाठी करत होते. डॉ. आदिल आणि जसीर यांनी ४ ठिकाणे ओळखली, जिथे ते दहशतवाद्यांना भेटत असत आणि टेस्टिंग करत असत. एनआयएला गॅस सिलिंडरचे तुकडे आणि स्फोटक सामग्रीचे पुरावे मिळाले आहेत. फॉरेन्सिक पथके आता तपास करतील की, स्फोटात त्याच प्रकारचा दारूगोळा वापरला गेला होता का. एका तपासकर्त्याने सांगितले, ‘कट येथूनच सुरू झाला. अतिरेक्यांनी याच जंगलात ट्रायल केले होते की ब्लास्ट डिव्हाईस कुठे आणि कसे लावले जाऊ शकते आणि स्फोट कसा घडवता येईल.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App