फडणवीस + अजितदादांची सातारा जिल्ह्यात जाऊन वेगवेगळी राजकीय पेरणी!!

Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आज एकाच दिवशी सातारा जिल्ह्यात जाऊन वेगवेगळी राजकीय पेरणी केली.Fadnavis + Ajitdada’s different political sowing by going to Satara district!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे जाऊन विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. त्यातून त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे आणि राम सातपुते ताकद दिली. फलटणचे पाणी पळवून इतरत्र विकास कामांचा दावा करण्यात धन्यता मानणाऱ्या बारामतीकरांना आणि त्यांच्या साथीदारांना फटकारले. माणदेशाची अपकीर्ती दुष्काळी म्हणून झाली होती, ती आता पाणीदार माणदेश अशी कीर्ती करून ओळख बदलायची ग्वाही दिली. फडणवीसांच्या दौऱ्यामुळे फलटण सह सातारा जिल्हा भाजप मध्ये राजकीय चैतन्य आले.



– एकसर मध्ये अजित पवार

त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाई तालुक्यातील मौजे एकसर येथे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कलास्मारकाची पाहणी केली. तसंच नव्यानं उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत स्मृती स्मारकाच्या भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळ्यात सहभागी झाले.

या स्मारकाद्वारे शाहीर साबळे यांनी प्रस्थापित केलेल्या लोककलेच्या समृद्ध परंपरेला नवी दिशा मिळेल. कलावंत आणि प्रशिक्षणार्थींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत हे स्मारक राज्यातील सांस्कृतिक चैतन्य अधिक दृढ करेल. त्याचप्रमाणे शाहीर साबळे यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्राच्या लोककलेला आणि संस्कृतीला समृद्ध करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज एकाच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यात जाऊन वेगवेगळी राजकीय पेरणी केली.

Fadnavis + Ajitdada’s different political sowing by going to Satara district!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात