राहुल गांधींचा ‘व्होट चोरी’ बॉम्ब फुसका, आरोप निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच उघडे

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मतदार यादीत छेडछाड झाल्याचा गाजावाजा करत निवडणूक आयोगावर आरोप केले.  पण त्यांच्या दाखवलेल्या ‘पुराव्याची’ पडताळणी केल्यानंतर तोच पुरावा खोटा निघाल्याने राहुल गांधींचा ‘व्होट चोरी’ बॉम्ब फुसका ठरला. Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा ‘व्होट चोरी’च्या आरोळ्या देत निवडणूक आयोगावर धावून गेले. पण यावेळीही त्यांचे दावे सत्यशोधनात खोटे ठरले आहेत. राहुल गांधींनी १८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत पॉवरपॉईंट सादरीकरण करत “कर्नाटकमध्ये काँग्रेस मतदारांची नावं संगणकीय पद्धतीने वगळण्यात आली” असा गाजावाजा केला. त्यांनी अलंद मतदारसंघाचे उदाहरण देत सांगितले की ६,०१८ मतदारांचे अर्ज बनावटपणे दाखल झाले आणि काँग्रेस समर्थकांनाच लक्ष्य केले गेले. Rahul Gandhi



सर्वात मोठा ‘पुरावा’ म्हणून त्यांनी बबिता चौधरी या महिलेचे नाव घेतले. “तिचे नाव यादीतून गायब झाले” असा आरोप केला. मात्र काही पत्रकारांनी यांनी राहुल गांधींचे सादरीकरण हाती घेतले आणि थेट निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संशोधन केली. बबिता चौधरी यांचे EPIC क्रमांक टाकताच, त्यांचे नाव मतदार यादीत असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच राहुल गांधी आणि बबिता चौधरी यांचा दावा सपशेल खोटा ठरला.

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत “१०० टक्के पुरावे आहेत” अशी गर्जना केली. पण प्रत्यक्षात त्यांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटलाच नाही. उलट त्यांच्या सादरीकरणाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर राजकीय चिखल उडवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.

राहुल गांधींच्या “व्होट चोरी”च्या आरोळ्या जोरात असल्या तरी सत्यशोधनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की काँग्रेस नेत्यांचे दावे पुराव्यांपुढे टिकत नाहीत.

Rahul Gandhi ‘vote theft’ bombshell leaked

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात