वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर अचूक हल्ले केले. पण इराणने कतार मधल्या अमेरिकन हवाई तळांवर हल्ले करून “बदला” घेतला. त्यामुळे आता तरी इराण शांततेच्या मार्गाकडे वळेल. मी इजरायलला देखील शांततेच्या मार्गाकडे वळायला सांगेन, असे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी इजरायल आणि इराण यांच्यात युद्धबंदी झाल्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात तशी युद्धबंदी काही झाली नाही. तथाकथित युद्धबंदी अस्तित्वात आल्यानंतर इराणने इस्राईलवर क्षेपणास्त्रे डागली. त्या तीन बळी घेतले. Israel Iran War
US President Donald Trump posts, "Iran has officially responded to our Obliteration of their Nuclear Facilities with a very weak response, which we expected, and have very effectively countered. There have been 14 missiles fired — 13 were knocked down, and 1 was 'set free,'… pic.twitter.com/1sy8TS8ht5 — ANI (@ANI) June 23, 2025
US President Donald Trump posts, "Iran has officially responded to our Obliteration of their Nuclear Facilities with a very weak response, which we expected, and have very effectively countered. There have been 14 missiles fired — 13 were knocked down, and 1 was 'set free,'… pic.twitter.com/1sy8TS8ht5
— ANI (@ANI) June 23, 2025
त्याआधी काल रात्री इराणने कतार मधल्या अमेरिकन हवाई तळावर 14 क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकेच्या फौजांनी त्यातली 13 क्षेपणास्त्रे पाडली. एकच क्षेपणास्त्र वेगळ्या दिशेने जाऊ दिले. पण यापैकी कुठल्याही क्षेपणास्त्रामुळे अमेरिकन हवाई तळावर किंवा कतार मध्ये कुठलेही नुकसान झाले नाही. इराणने या हल्ल्याची अमेरिका आणि कतारला आधीच माहिती दिली होती. त्यानुसारच इराणने हल्ला केला. त्यामुळे आता इराणच्या मनात कुठलीही तिरस्कार राहणार नाही. इराण आता शांततेच्या मार्गाकडे वळेल. मी इजरायलला देखील शांततेच्या मार्गाकडे वळायला सांगेन, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट मध्ये नमूद केले होते.
त्यानुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 4.30 वाजता ट्रम्प यांनी युद्धबंदी घोषित केली. पण इराणने ती पाळली नाही. इराणने इजराइल वर क्षेपणास्त्रे डागली. इजराइल मध्ये 3 बळी घेतले. त्यामुळे इजराइलही प्रतिहल्ला करायच्या बेतात आला.
यादरम्यान कतार संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. ते पुन्हा खुले केले. इराण विरुद्ध कतार जर हल्ला करणार असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू, असे संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांनी जाहीर केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App