NEET पेपर लीक प्रकरणात CBIने दाखल केले पहिले आरोपपत्र!

NEET

१३ आरोपींची नावे; आतापर्यंत एकूण ४० जणांना करण्यात आली आहे अटक CBI files first chargesheet in NEET paper leak case

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने NEET परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने 13 जणांना आरोपी बनवले आहे. सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रात नितीश कुमार, अमित आनंद, सिकंदर यादव, आशुतोष कुमार-1, रोशन कुमार, मनीष प्रकाश, आशुतोष कुमार-2 यांना आरोपी करण्यात आले आहे.



 

याशिवाय अखिलेश कुमार, अवधेश कुमार, अनुराग यादव, अभिषेक कुमार, शिवानंदन कुमार आणि आयुष राज यांचीही नावे आरोपींच्या यादीत आहेत. सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे की या प्रकरणात आतापर्यंत एकूण 40 आरोपींना अटक केली आहे, त्यापैकी 15 जणांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे आणि 58 ठिकाणी शोध घेतला आहे.

NEET परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने आतापर्यंत एकूण 40 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये बिहार पोलिसांनी केलेल्या 15 अटकेचाही समावेश आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की देशभरात 58 ठिकाणी छापे टाकून 40 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

CBI files first chargesheet in NEET paper leak case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात