विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकमान्य टिळक पुरस्कार समारंभात अनोखा संगम; छत्रपती शिवरायांचे वंशज शाहू महाराजांना( Shahu Maharaj ) सुधा मूर्तींचे वंदन!!, हे काल सायंकाळी राजधानीतल्या महाराष्ट्र सदनात घडले.
राज्यसभा खासदार सुधा मूर्ती (Sudha Murthy )यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू महाराज उपस्थित होते. या कार्यक्रमात सुधा मूर्ती यांनी पुरस्कार स्वीकारताना शाहू महाराज छत्रपती यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
या कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाचे म्हणजे सुधा मूर्ती यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. मराठी आणि कानडी माझी आई आहे. कृष्णासारख्या मलाही दोन आई आहेत. देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करताना मला मिळालेलं समाधान अवर्णनीय आहे, अशा भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केल्या.
सुधा मूर्तींनी आपल्या भाषणात वाघनखांचा आवर्जून उल्लेख केला. त्या म्हणाल्या, मी लहानपणी नेहमी आईला विचारायचे की शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खान मारला ती वाघनखे कुठे आहेत?? इंग्रज घेऊन गेले इतकच माहिती होतं. मी इंग्लडला गेले तेव्हा त्या म्युझीयममध्ये मी वाघनखे पाहिली तेव्हा मी त्या वाघनखांच्या पाया पडले. मी आज शाहू महाराजांच्या पाया पडणार आहे. कारण ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत!!, असे म्हणत सुधा मूर्ती या शाहू महाराजांच्या पाया पडल्या.
शरद पवारांनी सुधा मूर्ती यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, देशासाठी योगदान दिलेल्या अनेक मान्यवरांना हा पुरस्कार दिला आहे. सुधा मूर्ती यांना यंदाचा पुरस्कार दिला जातोय त्याचा मला आनंद आहे. देश स्वतंत्र होत असताना अनेकांनी कणखर भूमिका मांडली. त्यात लोकमान्य देखील होते. लोकमान्य टिळक यांची काळजी घेण्याची भूमिका तेव्हा शाहू महाराज यांनी घेतली होती. सुधा मूर्ती यांचं मनापासून अभिनंदन करतो. लोकांना हाताला काम देण्याचे काम इन्फोसिस करते. ते काम नारायण मूर्ती यांनी केले. त्यात साथ देण्याचं काम सुधा मूर्ती यांनी केले. त्यांचे यातले योगदान महत्त्वाचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App