विधानसभा निवडणुकीआधी नकोय कुणालाच शक्ती परीक्षण, त्यामुळेच पोटनिवडणुका टाळण्याकडे सगळ्यांचा कल!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी नकोय कोणालाच शक्ती परीक्षण, त्यामुळेच पोटनिवडणुका टाळण्याकडे सगळ्यांचा कल!!, असे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. No political party wants byelections now to avoid power tussle before assembly elections in maharashtra

महाराष्ट्रातील 11 नगरपरिषदांमधील रिक्त प्रभाग तसेच नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांतील रिक्त जागांवर राज्य निवडणूक आयोगाने 12 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मात्र या पोटनिवडणुकीला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपचा विरोध आहे. या तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडे संबंधित पोटनिवडणूक रद्द करण्याचे मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी पावसाचे कारण देण्याबरोबरच निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना फक्त तीन महिन्याचा कालावधी मिळेल असे कारण पुढे केले आहे.



परंतु त्या पलीकडे जाऊन कुठल्याच पक्षाला विधानसभा निवडणुकीआधी कुठलेच शक्ती परीक्षण नको असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण पोट निवडणुकांमध्ये शक्ती परीक्षण झाले, तर त्याचा परिणाम अवघ्या दोन-तीन महिन्यांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता सगळ्यात राजकीय पक्षांना वाटत आहे. त्यामुळे जे काही शक्ती परीक्षण व्हायचे, ते विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ द्या. त्याआधी प्रिलिमिनरी परीक्षेसारखे शक्ती परीक्षण नको, असा पोक्त राजकीय विचार शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप आदी पक्षांनी केला आहे. त्यामुळेच या पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केलीच आहे.

त्याचबरोबर उच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेऊन संबंधित पोटनिवडणूक रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांनी पावसाचे कारण तसेच शेतकरी कामात व्यस्त अशी अन्य कारणे देखील दिली आहेत. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राजकीय पक्षाला विधानसभा निवडणुकीआधी शक्ती परीक्षण नको असल्याचे खरे कारण समोर आले आहे.

No political party wants byelections now to avoid power tussle before assembly elections in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात