निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचे कार्यालय फोडले!

पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकातासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिक्रमणाविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत कोलकाता येथे भाजप कार्यालय फोडण्यात आले. कोलकाता येथील गोरागाचा, तरातळा येथे भाजपचे कार्यालय ज्या ठिकाणी फोडण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस पोहोचल्यावर त्यांची भाजप कार्यकर्त्यांशी बाचाबाची झाली.After the election BJPs office was broken in Bengal



पश्चिम बंगाल पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत राज्यभरातील फूटपाथवर उभारलेली हजारो दुकाने हटवली आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (27 जून 2024) पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांविरुद्ध प्रशासनाकडून चालवलेल्या मोहिमेबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मंगळवारी (२५ जून २०२४) एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकाता आणि सॉल्ट लेकमध्ये खाद्यपदार्थ, कपडे आणि विविध उत्पादने विकण्यासाठी दुकाने थाटणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांना हटवण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, कोलकाता पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून जेसीबी मशिनच्या सहाय्याने भवानीपूर भागातील सरकारी एसएसकेएम रुग्णालयासमोरील फूटपाथ, हातीबागन आणि गरियाहाट भागातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली.

कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही शहरातील फूटपाथवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ देणार नाही. सर्व प्रथम, आम्ही त्यांना (रस्त्यावरील विक्रेत्यांना) त्यांचे व्यवसाय चालवण्यासाठी त्यांनी बांधलेल्या तात्पुरत्या संरचना काढून टाकण्यास सांगत आहोत. जर ते सहकार्य करत नसतील तर आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करत आहोत.

After the election BJPs office was broken in Bengal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात