मोरेंच्या बरोबर धंगेकरांचा मिसळीवर ताव, पण आबा बागुलांनी फडणवीसांची भेट घेताच पुण्यात काँग्रेसला फुटला घाम!!

Congress candidate Ravindra dhangekar in trouble, aaba bagul meets devendra fadnavis

विशेष प्रतिनिधी

पुणे : एकीकडे पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्याबरोबर मिसळीवर ताव मारला, पण त्याच वेळी तिकडे आबा बागुल यांनी नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याबरोबर पुण्यातल्या काँग्रेसला घाम फुटला. पुण्याच्या तिरंगी लढतीची ही अनोखी कहाणी आज रंगली. Congress candidate Ravindra dhangekar in trouble, aaba bagul meets devendra fadnavis

पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड प्रभागात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर प्रचारासाठी पोहोचले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचाही नेमका त्याच वेळी त्याच प्रभागात प्रचार दौरा झाला. हा योगायोग होता. रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे उमेदवार अचानकपणे एकमेकांसमोर आले. नमस्कार – चमत्कार झाले. दोन्ही नेते कोथरूड मधल्या एका हॉटेलमध्ये गेले आणि दोघांनी शेजारी शेजारी बसून मिसळीवर ताव मारला.

एकीकडे हे मिसळ राजकारण रंगत असताना त्याच वेळी पुण्यातले काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी नगरसेवक आबा बागुल देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मधल्या बंगल्यावर पोहोचले. तिथे त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी भाजप प्रवेशाबद्दल चर्चा केली. रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या उपऱ्या उमेदवाराला नेत्याला काँग्रेसने तिकीट दिले आणि निष्ठावंतांना डावलले म्हणून आबा बागुलांनी काँग्रेस हाऊस समोर मोठे आंदोलन केले होते. ते धंगेकरांच्या प्रचारात सामीलही झाले नव्हते. मध्यंतरी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. तिला आबा बागुल गैरहजर राहिले होते.



दोघात तिसरा आणि आता चौथा

पण आज ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला नागपूरला पोहोचले. त्यामुळे आबा बागुलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली. पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर या दुरंगी लढतीत आधीच वसंत मोरे यांच्या रूपाने वंचितची एन्ट्री झाल्याने त्या लढतीला तिसरा आयाम जोडला गेला आहे. त्यामुळे धंगेकर तसेही अडचणीत आले आहेत. आता थेट काँग्रेसमध्येच आबा बागुलांच्या रूपाने बंडखोरी होत असल्याने धंगेकर यांची अडचण अधिकच वाढली आहे. आबा बागुल पुण्यात पाच वेळा नगरसेवक पदावर निवडून आले. ते स्थायी समितीचे अध्यक्षही होते. त्यांचा त्यांच्या विशिष्ट परिसरात प्रभाव आहे. त्या प्रभावाचा भाजपला लाभ होऊ शकतो आणि तिरंगी लढतीत धंगेकर आणखी अडचणीत येऊ शकतात, असा भाजप नेत्यांचा होरा आहे.

Congress candidate Ravindra dhangekar in trouble, aaba bagul meets devendra fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात