विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोणी तरी भास्कर जाधव हा भाडोत्री आणलाय माझ्यावर टीका करण्यासाठी. मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग मधल्या कार्यक्रमात आज दिला. Warning of Union Minister Narayan Rane
कोकणात नारायण राणे विरुद्ध इतर असा जबरदस्त संघर्ष पेटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोकण दौरा केला त्या दौऱ्यात भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर तोंडसुख घेतले होते त्या भास्कर जाधव यांना नारायण राणे यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. सिंधुदुर्गातील कार्यक्रमात देखील नारायण राणेंनी त्यांच्या बेधडक वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली.
नारायण राणे म्हणाले :
ज्या भास्कर जाधवला बाळासाहेब ठाकरे यांना सांगून आमदारकीचे तिकीट दिले. निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले. त्याचा भास्कर जाधवला विसर पडलाय. माझ्या जिल्ह्यात येऊन तो माझ्यावर टीका करतो. भास्कर जाधव माझ्याकडे आला प्रचाराला पैसे नाहीत. विचारले किती लागतील? म्हणाला 10 लाख लागतील. एकदा 10 आणि एकदा 15 लाख घेऊन गेला. परत देण्याचीही त्याची दानत नाही.
त्या भाडोत्री भास्कर जाधव बद्दल मी आत्ता जास्त बोलणार नाही पण वेळ येतच त्याला चोपणार हे मात्र नक्की!!
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पार पडलेल्या सभेत भास्कर जाधवांनी राणेंवर जहरी टीका केली होती. भास्कर जाधव म्हणाले होते की, नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो, असे जाधव म्हणाल होते. शिवाय भास्कर जाधवांनी नारायण राणेंचा नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता. ज्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा, असेही भास्कर जाधव म्हणाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App